12:23am | Apr 27, 2019 |
सातारा : सोनगाव तर्फ निंब ता.सातारा येथे दि. 25 रोजी रात्री साडेवाजता दोन गटात तुंबळ हाणामारी होवून राडा झाला. दोन्ही गटाकडून कोयता, कुर्हाडसारख्या शस्त्रांचा वापर झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. हाफ मर्डरसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून जखमींवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
अजित धनाजी शिंदे, रणजित धनाजी शिंदे, धनाजी अर्जुन शिंदे, सावित्री धनाजी शिंदे (सर्व रा.सोनगाव संमत निंब) यांच्याविरुध्द अजय विजय शिंदे (वय 23, रा.सोनगाव संमत निंब) यांनी तक्रार दिली आहे. दि. 25 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हाणामारीची घटना घडली आहे. 3 वर्षापूर्वी झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणातून हा हल्ला झाला. हल्ल्यावेळी संशयितांनी कुर्हाड, कोयता, खुरपे, लाकडी दांडके याचा वापर केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या मारहाणीत तक्रारदार अजय शिंदे, विजय शिंदे, गणेश कदम, विकास कदम, मोहन कदम हे जखमी झाले आहेत.
दुसरी तक्रार अजित धनाजी शिंदे (वय 32, रा. सोनगाव संमत निंब) यांनी गणेश वामन कदम, अजय विजय शिंदे, मिराबाई शिंदे, विकास कदम, विनोद शिंदे, प्रेमा कदम, तुळशीराम शिंदे, प्रवीण कदम, मोहन कदम (सर्व रा.माहुली सोनगाव) यांच्याविरुध्द तक्रार दिली आहे. दि. 26 रोजी रात्री साडेआठ वाजता संशयितांनी जुन्या वादाच्या कारणातून हल्ला केला. हल्ल्यामध्ये संशयितांनी कोयता, दगड, काठी याचा वापर केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्री सुमारे अर्धा तास ही धुमसाधुमसी सुरु होती. यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. या घटनेनंतर दोन्ही गटातील लोक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेवून पाहणी केली. गावामध्ये पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला. परस्परविरोधी तक्रार दाखल झाल्या असून संशयितांची धरपकड सुरु आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |