सातारा : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणात खबरदारी घेत आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सर्वच सेवा बंद करण्यात आल्या आहेत. असे असताना फलटण-इंदापूर तालुक्याच्या सीमेवर असणार्या आसू येथील निरा नदीपात्रात बंधार्याचे आणि बोगद्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु असून येथील कामगारांच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच सातारा जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची संबंधित ठेकेदाराने पायमल्ली केल्याचेच दिसून येत आहे.
याबाबत माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका व सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या सीमेवर असणार्या तावशी व आसू दरम्यान वाहत असलेल्या नीरा नदीच्या पात्रामध्ये स्कायलाईन या कंपनीचे बंधार्याचे व बोगद्याचे काम सुरु आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालपासून संपूर्ण महाराष्ट्रात जमाव व संचारबंदी करुन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेले आहे. घरात बसूनच कारोनाशी सामना करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. शहरापासून खेड्यापर्यंत सर्वत्र शुकशुकाट आहे. परंतू, आसू-तावशी दरम्यान नीरा नदीमध्ये मात्र स्कायलाईन कन्स्ट्रक्शनने सुमारे शंभरपेक्षा जास्त कामगारांच्या सहाय्याने काम सुरुच ठेवले असून संबंधित ठेकेदार मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही खबरदारी न घेता काम सुरु ठेवत असल्यामुळे आसू गावासह पंचक्रोशीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कालच दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा गुन्हे दाखल केले जातील, असे बजावले होते. परंतू असे असताना सातारा-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर सुरु असलेल्या कामाचा गैरफायदा घेत स्कायलाईनच्या ठेकेदाराने जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला कोलदांडा घातला आहे. त्यामुळे सातारा जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुख यांनी हे सुरु असलेले काम त्वरित बंद करावे, अशी मागणी आसू सह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केलेली आहे.
आसू-तावशी पाकिस्तानात आहे काय?
सातारा-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणार्या आसू-तावशी दरम्यान वाहत असलेल्या नीरा नदीवर औरंगाबाद येथील स्कायलाईन कन्स्ट्रक्शनचे काही महिन्यांपासून काम सुरु आहे. दरम्यान, देशात व राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने कोरोनाबाबत कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. परवा संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू लावून केंद्र व राज्य सरकारने आपले इरादे स्पष्ट केले होते. कालपासून राज्यात जमाव व संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असताना मात्र शासनाच्या आदेशाला डावलून आसू-तावशी दरम्यान सुमारे शंभरपेक्षा जास्त कामगारांच्या सहाय्याने स्कायलाईन कंपनीने आपले काम सुरुच ठेवले आहे. त्यामुळे राज्य शासनाचे आदेश असतानाही तो आदेश डावलून आसू-तावशीमध्ये काम सुरु असल्यामुळे ही दोन्ही गावे काय पाकिस्तानात आहेत काय? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |