सातारा : दि. 17 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातार्यात प्रचारासाठी येणार असल्याने शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. सैनिक स्कूल परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत. पर्यायी मार्ग खुले राहणार असून त्याचा नागरिकांना वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत.
सैनिक स्कूल परिसरातील बॉम्बे रेस्टॉरंट, विसावा नाका, गोडोली नाका, झेडपी चौक, बांधकाम भवन, कनिष्क हॉल या मार्गाकडून सभास्थळ बाजूकडे जाणारे रस्ते वाहतुक व पार्कींगसाठी खुले नसणार आहेत. बांधकाम भवन ते बॉम्बे रेस्टॉरंट रस्ता व कनिष्क हॉल, झेडपी चौक, अण्णासाहेब कल्याणी चौक याठिकाणीही वाहतुक बंद राहणार आहे. यासाठी पर्याय मार्ग खुले राहणार आहेत. पोवई नाका ते गोडोली नाका मार्गे अजंठा चौक- बॉम्बे रेस्टॉरंटपर्यत जाता येणार आहे. तसचे स्टँडकडून वाढे फाटा मार्गेण कोरेगाव वरुन येणारी वाहने खेडफाटा मार्गे, सदरबझार येतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी येणार्या वाहन चालकांसाठी चारही बाजूने पार्कींगची सोय करण्यात आली आहे. कराड-पाटणकडून येणारी वाहने गोळीबार मैदानाजवळील दुय्यम निबंधक कार्यालय व पशुवैद्यकीय दवाखाना येथे वाहने लावतील. याशिवार महामार्गावरील ठक्कर सिटी, इरीगेशन यांत्रिक विभाग, जंरडेश्वर नाका, स्टेडियम, पोलिस परेड मैदान, तालीम संघ मैदान, कोडोली जि.प.शाळा मैदान, क्रांतीस्मृती विद्यालय मैदान, कोटेश्वर मैदान, शानबाग विद्यालय मैदान, शिवाजी संग्रहालय मैदान, सेंट पॉल विद्यालत मैदान, टीसीपीसी मैदान, एमआयडीसी वन साईड रोड पार्कींग, पिरवाडी हनुमान मंदीर, यशोदा शैक्षणिक संकूल, रिमांड होम याठिकाणी त्या त्या दिशेने येणार्या वाहनांसाठी पार्कींगची सोय करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सपोनि विठ्ठल शेलार यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |