कराड : कोणताही उपक्रम सुरू करणे खूप सोपे असते पण तो टिकवणे खूप अवघड असते. डॉ. स्वाती थोरात यांच्या मार्गदर्शनामुळे मळाई महिला विकास मंच चे कार्य व आजपर्यत झालेले 40 महिला मेळावे हे अवघड कार्य सोपे झाले आहे.डा.स्वाती थोरात च्या मार्गदर्शनाखाली आयोजित महिला मेळाव्याचे त्यांनी भरभरून कौतुक केले. अशा वेळी समाजातील प्रत्येकाने कुटुंब घडवत असताना सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे, असे मत कृष्णा महिला सरिता बझार मलकापूरच्या यशस्वी उद्योजिका उत्तरा भोसले यांनी व्यक्त केले.
श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था व मळाई महिला विकास मंच यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दि.31 रोजी दु. 3.00 वाजता आदर्श ज्युनिअर कालेज मलकापूर येथे आयोजित महिला मेळावा व हळदी कुंकु समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी सौ शालिनीताई अशोकराव थोरात, मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. स्वाती थोरात, ड्रीम्स क्लासेस कराडच्या मा.सौ.तेजस्विनी शहा,कृष्णा हास्पीटल मलकापूरचे सुरक्षा अधिकारी मा.विलास चव्हाण,मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन सौ. अरूणादेवी गायकवाड, मलकापूर नगपालिकेच्या नगरसेविका सौ.निर्मलाताई काशिद, सौ.नूरजहॉं मूल्ला, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सारिका गावडे, सौ.प्रमिला सोळवंडे, सौ.मंगल कुंभार, दै.पुढारीच्या सहसंपादक सौ.प्रतिभा राजे, दै. तरूणभारतच्या घारे, यशवंतनगरीचे दिनेश कांबळे, मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक सर्व शिक्षिका, बहुसंख्य महिला पालक यांची उपस्थिती होती.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणांत डॉ. स्वाती थोरात यांनी मळाई महिला विकास मंचच्या कार्याचा आढावा घेऊन कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहूण्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सर्वासमोर मांडला.तसेच नारी हे राष्ट्राचे भविष्य आहे.नारी समाजाला घडवणारी आहे.त्यामुळे नारी पूजनीय आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी कृष्णा हॉस्पिटल चे सुरक्षा अधिकारी यांनी कुटुंबाच्या सुरक्षेचा उपाय म्हणून आगीचे प्रकार, आग कशी विझवावी, कोणते अग्निशमन वापरावे हे प्रात्यक्षिकाद्वारे महिलांना करून दाखविले.व नैसर्गिक आपत्तीवर मात कशी करावी यांवर मार्गदर्शन केले.तसेच ड्रीम्स क्लासेसच्या तेजस्विनी शहा यांनी गौरी सजावट कशी करावी, अनोख्या पध्दतीने गौरी कशी बसवावी याचे प्रात्यक्षिकेद्वारे पूरक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श ज्युनिअर कालेजच्या प्राध्यापिका सौ.सुरेखा खंडागळे व सौ.शिला पाटील यांनी केले व आभार कन्याशाळा मलकापूरच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे यांनी मानले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |