03:17am | Feb 13, 2019 |
कराड : येथील अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्युटस् डॉ.दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये, महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्यावतीने ’बिल्डर ऍन्ड कॉन्ट्रॅक्टर्स मीट-2019’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक आरसीसी कन्सलटंट साताराचे प्रमुख श्रीराम कुलकर्णी होते. तर, यश कन्स्ट्रक्शन कराडचे अविनाश शहा, हॅबिटॅट कन्स्ट्रक्शनचे धनंजय कदम, भक्ति कन्स्ट्रक्शनचे राजेश पाटील, एस.के.कन्स्ट्रक्शनचे श्रीधर इनामदार, आर्या इन्फास्ट्रक्चरचे प्रताप गुजर, एस.बी.बिल्डरचे भास्करराव शिंदे, शिवाणी सप्लायर्सचे सागर मुळे, क्रेडाईचे सचिव, मकरंद जाखलेकर व प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक जानुगडे तसेच, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अन्वर मुल्ला, स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ.अभिजीत झेंडे, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.आर.ई.पवार व प्रा.टी.एफ. मुजावर, विभागप्रमुख प्रा.प्रकाश चोरगे, प्रा.आशिष पाटील, प्रा.शिवाजीराव लोकरे, प्रा.हेमंत शेटे, क्रिडा संचालक प्रा.अयुब कच्छी, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. प्रकाश बनसोडे व जनसंपर्क अधिकारी अबुबकर सुतार आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रीराम कुलकर्णी यांनी संत तुकाराम यांच्या ओवीतून कामाबद्दलची जागृती करीत, आपल्या कामाशी व जीवनाशी सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कसा संबंध असतो, आव्हाने कशी स्विकारावीत, आपण करीत असलेल्या कामाबद्दल असणारी आपली तळमळ व कष्ट याबद्दल माहीती देत, रेरा कायद्ा काय आहे या विषयी मार्गदर्शन केले. तसेच स्थापत्य अभियांत्रिकीच्या अनुशंगाने नवीन कोर्सेसची माहिती दिली.
मकरंद जाखलेकर यांनी कन्सलटंसीवर भाष्य करीत, प्रात्यक्षिक अनुभावाच्या (प्रक्टीकल एक्सपिरीअन्स) आवश्यकते विषयी तसेच, यशस्वी होण्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची तयारी असणे हाच ’मुलमंत्र’ असल्याचे सांगून, स्थापत्य अभियांत्रिकीमधील संधी याविषयी मार्गदर्शन केले. श्रीधर इनामदार यांनी आपल्या स्व-अनुभव कथन केले. अविनाश शहा यांनी आपल्या कामाबद्दलचा प्रामाणिकपणा, असणारा आत्मविश्वास व मिळणारे यश याविषयी माहिती दिली. तसेच साईटवर काम करताना करता येणारे बारकावे विशद केले. शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचेे समाधान मान्यवरांनी केले आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत व सत्कार प्रचार्य डॉ.अन्वर मुल्ला, विभागप्रमुख डॉ.अभिजीत झेंडे, समन्वयक प्रा.आर.ई.पवार व प्रा.टी.एफ. मुजावर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ.अभिजीत झेंडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कु.सायली चव्हाण या विद्यार्थिनीने केले. आभार समन्वयक प्रा.आर.ई.पवार यांनी मानले. सुत्रसंचालन कु. ऐश्वर्या चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमासाठी स्थापत्य अभियांत्रिकीचे प्रथम वर्ष ते अंतीम वर्षाचे विद्यार्थी, अधिष्ठाता, प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |