सातारा : गेल्या दोन वर्षांतील अबोला, कटू प्रसंग, नकोशा आठवणींना पाठीवर टाकत अखेर श्री. छ. खासदार उदयनराजे भोसले व आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील मनोमिलनाच्या दुसऱ्या पर्वाला प्रारंभ झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रमुख मान्यवरांसह या मेळाव्याला लोटलेली अलोट गर्दी या प्रसंगाची साक्षीदार ठरली!
सातारा व जावळी तालुक्यातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा मेळावा मंगळवारी कल्याण रिसॉर्टवर झाला. या वेळी दोन्ही राजांनी स्मित हास्य, करत एकमेकांच्या हातात हात देत परस्परांच्या मनातील जळमटे झटकली. ‘दगाफटका होणार नाही. उदयनराजेंना सातारा- जावळीतील आपले कार्यकर्ते सर्वाधिक मताधिक्य देतील याची मी ग्वाही देतो’ अशा शब्दात शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
'आमच्या दोघांमध्ये कटूता निर्माण करण्यासाठी कोणीही प्रयत्न केल्यास त्या प्रवृत्तीस वेळीस ठेचले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
"माझी निवडणूक आहे म्हणून आम्ही एकत्र येतोय असा समज कोणीही करून घेऊ नका. तुम्हा सर्वांची अधिकाधिक सेवा करण्याची संधी मिळावी एवढीच अपेक्षा बाळगतो. विधानसभा निवडणुकीमध्ये आमदारांचा प्रचार करणार का, अशी शंका उपस्थित केली जाते; पण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार निवडून आल्याचे मी आजच जाहीर करतो’’ असा शब्द उदयनराजे भोसले यांनी दिला.
गत नगरपालिका निवडणूकांच्या निमित्ताने दोन्ही भावंडांमध्ये अबोल्याची दरी निर्माण झाली होती. साताऱ्यातील हा संघर्ष पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार, दोन्ही तालुक्यांतील वडीलधाऱ्या मंडळीच्या साक्षीने, काल अलोट गर्दीत संपूष्टात आला. यावेळी दोन्हीकडील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणांमध्ये मनोमिलनाच्या दुसऱ्या पर्वाला शुभेच्छा देत एक दिलाने काम करण्याचा निर्धार जाहीर केला.
आम्ही तर टॉम अँड जेरी...
शिवेंद्रराजे व मी म्हणजे टॉम अँड जेरीची जोडी आहे, अशी उपमा दस्तूरखुद्द उदयनराजेंनीच दिली. आमचं म्हणजे असं आहे, ‘तुझं माझं जमेना अन् तुझ्या वाचून करमेना’. त्या वेळी उपस्थितांनी शिट्या व टाळ्यांचा गजर केला.
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |