12:21am | Jun 22, 2018 |
सातारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून आज घ्याव्या लागलेल्या सातारा नगरपालिकेच्या विशेष सभेत सत्ताधारी सदस्यांनी गोंधळ घालत बहुमताच्या जोरावर विषय पत्रिकेवरील सर्व तीनही विषय हाणून पाडले. भाजपच्या सहा सदस्यांनी सभागृहात तटस्थतेची भूमिका घेतली. प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस नगराध्यक्षांनी गैरहजेरी लावली.
विरोधी सदस्यांचे विषय डावलल्याने नगर विकास आघाडीने कायदेशीर तरतुदीचा आधार घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष सभा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी सभागृहात विशेष सभा झाली. निवडीच्या विशेष सभा वगळता पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी सभा झाली, ज्यामध्ये सभेच्या अध्यक्षस्थानी सत्तारूढ आघाडीपैकी कोणीही सदस्य नव्हते. सत्ताधाऱ्यांनीच विषय रद्द करण्याची सूचना मांडावी, हेही त्यामुळे पहिल्यांदाच घडले. सभेच्या सुरवातीस सूचना व उपसूचना कोणी मांडायची यावरून सत्तारूढ सातारा विकास आघाडी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. एक- एक करत सत्ताधाऱ्यांनी विविध कारणे, टिपण्या पुढे करत विषय पत्रिकेवरील तिन्ही विषय रद्द करण्याच्या सूचना दिल्या. वसंत लेवे यांनी मुद्देसूद मांडणी करत विरोधी सदस्यांवर हल्ला चढवला. पालिकेचे उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, ऍड. दत्ता बनकर, यशोधन नारकर, श्रीकांत आंबेकर आदींनी त्यांना साथ दिली. विरोधी पक्ष नेते अशोक मोने, पक्षप्रतोद अमोल मोहिते, शेखर मोरे- पाटील, रवींद्र ढोणे यांनी विषय पत्रिकेवरील विषय मंजुरीसाठी खिंड लढविली. त्यांची निकराची झुंज बहुमतापुढे फिकी पडली. शाब्दिक चकमकीनंतर मताला टाकले गेलेले तिन्ही विषय 22 विरुद्ध 11 मतांनी फेटाळण्यात आले. भाजपच्या सभागृहातील पाच सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली.
सत्ताधारी सातारा विकास आघाडीच्या राजकीय कुरघोडया पालिकेच्या इतिहासात जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या पहिल्या सभेत स्पष्टपणे दिसून आल्या. सातारा शहराच्या विकासाचे तब्बल सव्वाशे कोटीचे प्रस्ताव सातारा विकास आघाडीने बहुमताने फेटाळले . त्यामुळे पालिकेत विकास कामांवर चर्चा कमी पण केवळ राजकीय वर्चस्ववादाचे विदारक चित्र पहायला मिळाले .नगराध्यक्षा माधवी कदम या सभेला गैरहजर होत्या. प्रांत स्वाती देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सातारा विकास आघाडीने नगरविकास आघाडीची बहुमताच्या जोरावर पुरती कोंडी केली. नगरसेवक रविंद्र ढोणे यांच्या वॉर्डातील बहुउद्देशीय हॉल व व्यायामशाळा , रस्त्याचे क्राँक्रिटीकरण सह जिल्हा नियोजन समितीत जाणारे पंधरा विषय बावीस विरुद्ध अकरा मतांनी फेटाळले. त्यामुळे तब्बल सव्वाशे कोटी रुपयांच्या कामांना ब्रेक बसला.
अवघ्या तीन विषयांची विषायपत्रिका आणि नगरविकास आघाडीने मागणी केल्याने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी बोलावलेली सभा यामुळे सातारा विकास आघाडीने गोंधळ करायचा आणि विषय हाणून पाडायचा या रणनीतीवर बिनचूक काम केले . ढोणे यांच्या वॉर्डातील बहुउद्देशीय हॉलला अपुरी जागा , तिथे आठ सीटर संडास असल्याचे देण्यात आलेले कारण अशा अनेक अडचणीच्या सूचना उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी मांडत विषय रद्द करण्याची मागणी केली . सातारा विकास आघाडी नगराध्यक्षांना वगळून काम करते आणि आपण जे करतोय ते सर्वच योग्य या भ्रमात आहे असा टोला अशोक मोने यांनी लगावताच बनकर मोने किशोर शिंदे यांच्यात शाब्दिक खडाजंगी जुंपली तुम्ही आम्हाला सांगू नका असे बनकर यांनी सुनावल्यावर वातावरण अगदीच तप्त झाले . साठ हजार नागरिकांना तुम्ही विकासापासून डावलता य आणि आमच्या वॉर्डात विकासकामे होणार नाही असे मोठे बोर्ड लावा अशी मागणी अशोक मोने यांनी करत आपला त्रागा व्यक्त केला .
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |