06:25pm | Sep 28, 2018 |
वाई : गेल्या सहा वर्षापासून सातार्यातून प्रकाशित होणारे ‘सातारा टुडे’ ऑनलाईन न्यूज पोर्टलच्या कार्यालयावर भ्रष्टाचाराची बातमी प्रकाशित का केली यावरुन चार महिलांनी काल दिनांक 27 सप्टेंबर 2018 रोजी सातारा टुडे च्या कार्यालयात जावून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन कार्यालय फोडण्याची धमकी दिली होती. या प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करणार्या चार महिलांच्या कृत्याचा वाई शहर पत्रकार संघ, वाई पत्रकार संस्था, वाई तालुका पत्रकार संघटना या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करीत आहे.
वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजातील चांगल्या-वाईट घटनांचा परामर्श माध्यमे घेत असतात. सदृढ लोकशाहीसाठी माध्यमांचे बळकटीकरण करणे हे आजच्या समाजाचे काम आहे. मात्र, असे असताना काही अपप्रवृत्ती आपले काळे पाप झाकण्यासाठी प्रसार माध्यमांच्या कार्यालयांवर हल्ले करतात. त्यामुळे पत्रकारांनी अशा प्रवृत्तींविरोधात काही लिहू नये, अशी यामागची भावना असते. सातारा टुडे ने सातत्याने अपप्रवृत्तींविरोधात निर्भिडपणे लिखाण केले आहे. सातारा जिल्ह्यातील अवैध खाजगी सावकारी असो, तेटली बोगस सातबारा प्रकरण असो या व अशा अनेक प्रकरणांविरोधात सातारा टुडे ने आवाज उठविलेला आहे. सातारा टुडे नेहमीच सत्याच्या बाजूने उभे राहिले आहे. सर्वसामान्यांना न्याय देताना सातारा टुडे चे संपादक संग्राम निकाळजे व त्यांच्या सहकार्यांनी कधीच कोणाची भीड ठेवली नाही. जिल्ह्यातील अनेक सामाजिक विषय निर्भिडपणे मांडले आहेत. गेल्या सहा वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील एक विश्वासार्ह ऑनलाईन वृत्तपत्र म्हणून सातारा टुडे ची ओळख आहे. असे असताना वाईतील बोगस जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्रांच्या भ्रष्टाचाराचे वृत्त सातारा टुडे ने प्रसिद्ध केले होते. याचा राग मनात धरुन ‘त्या’ बोगस केंद्रचालक महिलांसह भाजपच्या महिला पदाधिकार्यांनी काल दि. 27 रोजी सातारा टुडे च्या कार्यालयात जाऊन कार्यालयातील कर्मचार्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत दमदाटी केल्याची निंदनीय घटना घडली असून हा माध्यम स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. संबंधित महिलांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच वाई तालुका पत्रकार संघ, शहर पत्रकार संघ व वाई पत्रकार संस्था तीव्र शब्दांत या घटनेचा निषेध करीत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |