03:54am | Aug 05, 2019 |
सातारा : शासन लोकांसाठी विविध योजना राबवित असते. या योजनांच्या माध्यमातून विकासासाठी अनुदान देते हे अनुदान उपकार नसून तो आपला हक्क आहे, या हक्काची जाणीव व माहिती व्हावी यासाठी आज साताऱ्यात विद्यार्थी आणि पालकांसाठी विधी सेवा महाशबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीरामध्ये विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले आहेत या स्टॉला भेट देऊन आपल्या विषयी कोणत्या योजना आहेत, याची माहिती घेऊन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा जिल्हा पालक न्यायमुर्ती महेश सोनक यांनी आज केले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विधी सेवा महाशिबीराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबीराचे उद्घाटन आज न्यायमुर्ती महेश सोनक यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन प्रसंगी प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सावंत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कुंभोजकर यांच्यासह सर्व न्यायाधीश उपस्थित होते.
आजची मुले आपल्या देशाचे भविष्य आहे. त्यांचा सर्वगुण संपन्न विकास कसा होईल याची जबाबदारी पालक, शिक्षक आणि समाजाचीही आहे, असे सांगून न्यायमुर्ती श्री. सोनक पुढे म्हणाले, मुलांनो भविष्याला सामोरे जाताना अनेक अडचणी येताता या अडचणींना समर्थपणे तोंड द्या. कुठल्याही कामाची लाज बाळगू नका. तुमच्यामध्ये दया, क्षमा आणि शांती हे गुण रुवजून अहंकारापासून दूर रहा.
मुले हेच देशाच्या विकासाचे शिल्पकार आहेत त्यामुळे आपल्या देशाची प्रतिमा उंचविण्यासाठी देशाच्या विकासात तुमचा सहभाग महत्वाचा आहे. विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या कल्याणकारी कायदे, योजनांची अंमलबजावणी व कायद्याची माहिती देणे हा विधी सेवा महाशिबीराचा उद्देश आहे. या शिबीराचा भविष्याच्या वाटचालीसाठी लाभ घ्यावा, असे सांगून न्यायमुर्ती श्री. सोनक यांनी उपस्थित मुलांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या विधी सेवा महाशिबीरामध्ये मुलांना व त्यांच्या पालकांना त्यांच्या विषयी असणाऱ्या कायद्याची माहिती सोप्या भाषेत सांगण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये मसूल विभागाकडूनही स्टॉल उभारण्यात आलेले आहे. मुलांना लागणाऱ्या विविध प्रमापत्रे स्टॉलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने भव्य असे विधी सेवा महाशिबीराचे आयोजन केले आहे या शिबीराचा जास्तीत जास्त मुलांनी व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवान करण्यात आले.
मुलांसाठी व पालकांसाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबविते असते या योजनांची व त्यांच्यासाठी असणाऱ्या कायद्याची माहिती व्हावी यासाठी या विधी सेवा महाशबीराचे आयोजन करण्यात आल्याचे प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कुंभोजकर यांनी सांगितले.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सावंत यांनी विधी महाशिबीरास सहकार्य करणाऱ्या सर्व विभागांचे आभार मानले. या कार्यक्रमास प्रांताधिकारी स्वाती देशमुख, तहसीलदार आशा होळकर, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षिरसागार, महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |