सातारा : सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या संयोजकांनी पोलिस परेड ग्राउंडवर विनापरवाना ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेप लावून ध्वनी प्रदुषण केल्याने त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल करावा, असा तक्रार अर्ज दोघांनी सातारा पोलिसांना दिला. यामुळे मॅरेथॉनप्रकरणी पोलिस गुन्हा दाखल करणार का? तो कोणावर व कधी गुन्हा दाखल होणार? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, नुकतेच आयजी सुहास वारके यांनीही चौकशी करणार असल्याचे सूतोवाच केल्याने खळबळ उडाली आहे.
नरेंद्र पाटील (रा.सदरबझार) यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, रविवारी दि. 25 रोजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे पहाटे 5 वाजता त्यांना आवाजाच्या दणदणाटाने जाग आली. पोलिस परेड ग्राउंड परिसरात ते आल्यानंतर आवाज मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांनी 101, 100 यावर फोन केला. मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फोन केला असता ती हद्द शाहूपुरी पोलिस ठाण्याची असल्याची सांगण्यात आले.
नरेंद्र पाटील यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फोन केला मात्र तेथून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. काही पोलिसांनाही त्यांनी फोन केला. मात्र कोणाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या लॅन्ड लाईन क्रमांकाला फोन केला असता तो लागला. पोलिस परेड मैदानावर मोठ्या आवाजात ध्वनीक्षप सुरु असून त्यामुळे ध्वनी प्रदुषण होत असल्याची तक्रार फोनवरुन सांगितली. यावर पोलिसांनी पीसीआर व्हॅन पाठवतो, असे निवेदनामध्ये म्हटले आहे.
नरेंद्र पाटील यांनी पोलिस ठाण्याला सांगितल्यानंतर पोनि मुगुटराव पाटील यांनाही फोन करुन ध्वनी प्रदुषण होत असल्याची माहिती दिली. सुमारे अर्ध्या तासाने पोलिसांडून ध्वनी प्रदुषणाची तक्रार द्यायची असेल तर पोलिस ठाण्यात जावून तक्रार द्या, असे सांगितले. यापूर्वीही पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केल्यानंतर पूर्वीच्या अधिकार्यांनी तक्रार घेतली नसल्याचा अनुभव होता. यामुळे तक्रार दिली नाही. दरम्यान, नुकतीच शांतता कमिटीची बैठक झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना भेटल्यानंतर पाटील यांनी अद्याप मॅरेथॉनविरुध्द ध्वनी प्रदुषणाची तक्रार असल्याचे सांगून तसे निवेदन दिले. त्यानुसार सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांना याबाबतचा पुढील तपास करण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, दुसरा तक्रार अर्ज सुजीत आंबेकर यांनी दिला आहे. निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, दि. 25 रोजी मॅरेथॉन स्पर्धेच्या ठिकाणी मोठ्या आवाजात ध्वनी क्षेपक लावून नृत्य सुरु होता. पोलिस मैदानवर पोलिसांसमोरच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग झालेला आहे. स्पर्धा सुरु असताना एक स्पर्धक महिला पळत असताना कोसळली. संबंधित महिलेला उपचारासाठी त्यांनीच रुग्णवाहिका बोलावून पुढील उपचारासाठी पाठवले असल्याचे निवेदनामध्ये म्हटले आहे. दरम्यान, मॅरेथॉन संयोजकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |