12:07am | Sep 02, 2018 |
सातारा : देशाच्या रक्षणासाठी छातीचा कोट करुन रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून देशाची रक्षा करणार्या जवानांबद्दल देशवासियांमध्ये नेहमीच आदराची भावना असते. सातारा जिल्हा लष्करी परंपरेचा म्हणून संपूर्ण देशभरात ओळखला जातो. आज बेळगाव येथील मराठा लाईट इन्फ्रंट्रीच्या मुख्यालयातून सातारा जिल्ह्यातील तब्बल 70 जवान सेवानिवृत्त झाले. बेळगावमधून पहाटे निघाल्यानंतर आज सकाळी सातारा बसस्थानकात पोहोचल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
देशाच्या सेवेसाठी सातारा जिल्ह्यातील हजारो जवान सुरक्षा दलामध्ये कार्यर त आहेत. दरवर्षी शेकडोजण सैन्य दलात भरती होतात, तर शेकडो सेवानिवृत्तही होत असतात. देशात कोठेही, काहीही अनुचित घटना घडल्यास सुरक्षा दलांमध्ये कार्यरत असणारे सातारचे सुपूत्र आपल्या कर्तृत्वाने सातारा जिल्ह्याचे नाव दिघंत पोहोचवतात. पोलीस, अर्ध सैनिक दल व लष्करात सातारचे जवान नेहमीच अग्रेसर असतात. देशाच्या रक्षणासाठी सातारा जिल्ह्यातील अनेक जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. याच कारणामुळे लष्करी परंपरेचा जिल्हा म्हणून सातारची ओळख देशभर आहे. देशातील लष्करी रेजिमेंटमध्ये अतिशय महत्त्वाची रेजिमेंट म्हणून मराठा लाईट इन्फ्रंट्रीकडे पाहिले जाते. आतापर्यंतच्या अनेक लढायांमध्ये मराठा लाईट इन्फ्रंट्रीने आपले शौर्य जगाला दाखवले आहे.
मराठा लाईट इन्फ्रंट्रीचे मुख्यालय बेळगाव (कर्नाटक) येथे आहे. येथील मुख्यालयातून आज सातारा जिल्ह्यातील सुमारे 70 जवान सेवानिवृत्त झाले. आज पहाटे हे जवान एसटी बसने बेळगावमधून निघाल्यानंतर आज सकाळी नऊ वाजता त्यांचे आगमन सातारा येथील मध्यवर्ती बसस्थानकात झाल्यानंतर माजी सैनिक संघटना, जवानांचे नातेवाईक तसेच पोलीस दल, सामाजिक कार्यकर्त्यांनी या जवानांना हार व पुष्पगुच्छ देवून त्यांनी केलेल्या देशसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या आदरातिथ्यामुळे सेवानिवृत्त जवान भावूक झाले. सातारा बसस्थानकातून या जवानांची सवाद्य मिरवणूक पोवई नाक्यापर्यंत काढण्यात आली. यावेळी पोवई नाक्यावरील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन या निवृत्त जवानांनी सातारच्या जनतेचे आभार मानले. यावेळी सातारा शहरात कार्यरत असणारे सुमारे 150 जवानही यावेळी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |