02:26am | Jul 19, 2019 |
बेंगळुरू : कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकारचं भविष्य काय असेल याचा निर्णय आज रात्रीपर्यंत लागण्याची शक्यता होती. आज दिवस संपेर्यंत कुमारस्वामी सरकारच्या विश्वास दर्शक ठरावाची प्रक्रिया पूर्ण करा, असे लेखी पत्र कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी अध्यक्ष रमेश कुमार यांना दिले. मात्र विधानसभा अध्यक्षांनी
राज्यपालांचे आदेश धुडकावून सभागृहाचे आजचे कामकाज विश्वासदर्शक ठराव न घेताच तहकूब केले. त्यामुळे राज्यपालांच्या पत्राला अध्यक्षांनी उत्तर द्यावे आणि आजच विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्यावे या मागणीसाठी भाजप आमदार रात्रभर सभागृहातच धरणे आंदोलन करत आहेत. विश्वासदर्शक ठरावावरील चर्चा पुन्हा उद्या सकाळी ११ वाजल्यापासून विधानसभेत सुरु होणार आहे.
दरम्यान, राज्यपाल वजुभाई यांनी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना पत्र लिहून शुक्रवारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. सुमारे दोन आठवडे सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. या दरम्यान, सदनात बंडखोर आमदारांसह १९ आमदार गैरहजर राहिले. राज्यपालांनी रमेश कुमार यांना लिहिले की, 'विश्वासदर्शक ठराव यावेळी सभागृहाच्या विचाराधीन आहे. मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे की ते सभागृहाच्या विश्वासास कायम पात्र राहतील. आज दिवस संपेपर्यंत विश्वासदर्शक प्रस्तावावर मतदान घेण्याबाबत विचार करा.' काँग्रेसने राज्यपालांच्या अशा हस्तक्षेपाबाबत आक्षेप घेतला आहे. 'राज्यपालांनी संविधानानुसार सदनाच्या कामकाजात दखल द्यायला नको,' असे काँग्रेसचे आमदार एच.के. पाटील म्हणाले. दरम्यान, विधानसभेचे आजचे कामकाज स्थगित करण्यात आल्याने सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर उद्या सकाळी ११ वाजता पुन्हा चर्चेला सुरुवात होईल. त्यावेळी सभागृहात किती आमदार हजेरील लावतात आणि विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया पूर्ण होते की नाही हे स्पष्ट होईल.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |