सातारा : सुरूचि राडाप्रकरणी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी शनिवारी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर बुधवारी (दि. 25) सुनावणी होणार आहे. दरम्यान, आ. शिवेंद्रराजे भोसले यांना यापूर्वीच तात्पुरता जामीन मिळाला आहे. या दोन्ही नेत्यांच्या जामीन अर्जावर एकाच दिवशी सुनावणी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार बुधवारी खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
आनेवाडी टोल व्यवस्थापनावरून दि. 5 ऑक्टोबर 2017 रोजी आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरूचि या बंगल्यावर खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे सातार्यात एकचखळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही नेत्यांच्या समर्थकांची धरपकड सुरू केली होती. या प्रकरणात दोन्ही बाजूंकडील सुमारे 150 हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
यानंतर आ. शिवेंद्रराजे व खा. उदयनराजे यांच्या समर्थकांनी जामीनासाठी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये काहींना जिल्हा न्यायालयात तर काहींना उच्च न्यायालयात जामीन मिळाला होता. तर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनीही काही दिवसांपूर्वी जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांनाही ताप्तपुरता जामीन मंजूर झाला होता. यानंतर शनिवारी दुपारी खा. उदयनराजे यांच्यावतीने शनिवारी अॅड. ताहीर मणेर यांनी अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल झाल्यानंतर न्यायालयात या अर्जावर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अॅड. मिलिंद ओक यांनी युक्तिवाद केला. या सुनावणीत अॅड. ओक यांनी न्यायालयाने दोन्ही राजेंची सुनावणी एकाच दिवशी ठेवावी. या सुनावणीस सर्व पोलिस अधिकार्यांनी उपस्थित रहावे, असा युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य मानत खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या जामीन अर्जावर बुधवार, दि. 25 रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगितले. बुधवारी होणार्या सुनावणीत ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. धैर्यशील पाटील हे खा. उदयनराजे भोसले यांची बाजू मांडणार आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |