12:09am | Oct 18, 2018 |
महाबळेश्वर : गुजरात मधील एका उत्तर भारतीय कामगाराच्या गैरकृत्यामुळे तेथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तश्याच प्रकारचा प्रकार महाबळेश्वर येथे होऊ नये यासाठी खबरदरीचा उपाय म्हणुन हॉटेल व खाजगी बंगल्यामधील कामगार, बांधकाम कामगार. दुकानातील कामगार यांची पोलिस विभागाकडुन चारित्र्य पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी महाबळेश्वर येथील बैठकीत बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर हॉटेल संघटनेचे अध्यक्ष कैलेश तेजाणी व उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके उपस्थित होते.
येथील हॉटेल व्यवसायिक व्यापारी व नागरीकांच्या अडचणी जाणुन घेण्यासाठी हॉटेल ड्रीमलॅण्ड येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख हे बोलत होते या वेळी पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे मनिषभाई तेजाणी रमेशभाई गौर संतोष शिंदे यशवंत घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी प्रारंभी प्रास्ताविक केले, तर उप विभागीय पोलिस अधिकारी यांनी नागरीकांनी आपल्या समस्या मांडण्याचे आवाहन केले. त्यानुसार अनेक नांगरीकांनी आपले प्रश्न मांडले या प्रश्नांना उत्तर देताना जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी वरील प्रमाणे आवाहन केले. ते म्हणाले की महाराष्ट् बाहेरील कामगार मोठया प्रमाणावर येथे दिसुन येत आहे, परंतु त्यांची सखोल माहीती घेतली जात नाही. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले कामगार काम करीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा खबरदरीचा उपाय म्हणुन त्यांचे अद्यावत नोंदी ठेवा.
तुमच्या हॉटेलमध्ये राहण्यास असलेल्या प्रत्येकाचे ओळखपत्र घेणे बंधनकारक आहे. हॉटेल लॉजेस प्रमाणे खाजगी बंगल्या मध्येही हॉटेल व्यवसाय सुरू आहे. न्याहरी व निवास योजनेअंतर्गतही हॉटेल व्यवसाय केला जातो अशा सर्वांनीच पर्यटकांची ओळख पटविणारे ओळखपत्र व इतर माहीती घेवुन त्याचे जतन केले पाहीजे. याबाबत सर्वांनी पोलिस खात्यास सहाकार्य करावे असेही देशमुख म्हणाले. मॅप्रो गार्डन, वेण्णालेक टोल नाका ,आर्थरसीट रोड ,सुभाष चौक, छ. शिवाजी चौक येथे मोठया प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. अशा तक्रारी नागरीकांनी केल्या याबाबत बोलताना जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणाले की मॅप्रो यांचा हा खाजगी व्यवसाय आहे. त्यांचेकडे येणारे पर्यटकांच्या वाहनांची सोय करणे हे त्यांचे काम आहे. त्यांचेकडे आलेल्या पर्यटकांना रस्त्यावर आपले वाहन उभे करता येणार नाही. असे होत असेल तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल शहरातील वाहतुकीच्या कोंडी संदर्भात त्यांनी वाहनतळांची संख्या वाढवण्यावर भर दिला काही मोकळया जागा वाहनतळासाठी घेता येतात का? या बाबत पडताळणी केली जाईल पोलिस मैदानावर वाहनतळ सुरू करण्याची मागणी या वेळी करण्यात आली अॅड. संजय जंगम यांनी या मागणीचे निवेदनही त्यांना सादर केले या बाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देशमुख यांनी दिले. पेट्रोल व डिजेल या शिवाय इतर इंधनावर चालणारे वाहनांचा आता विचार करावा लागणार आहे तसेच आपल्या शहराची क्षमता किती हे एकदा निश्चित करावे लागेल त्या पेक्षा अधिक वाहने आपल्या शहरात येणार नाही याची खबरदारी आपल्याला भविष्यात घ्यावी लागेल अन्यथा देशातील इतर पर्यटन स्थळांवर जी वेळ आली आहे ती वेळ महाबळेश्वरवर येण्यास वेळ लागणार नाही असा इशाराही जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिला.
यावेळी पांचगणी येथील सहा. पोलिस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी बैठकीस विजयभाई सेवक रमाणी प्रदीपभाई जव्हेरी हर्मोशबाबा महाबळेश्वरवाला सन्नी बावळेकर लिलाताई शिंदे विजय नायडु प्रविण भांगडीया आनंद पल्लोड अंकुश इगावे मयुर डिकांडा महेश पल्लोड संजोग तोष्णीवाल सचिन धोत्रे रविंद्र भिलारे संजय पार्टे सुनिल भाटीया आदी मान्यवर उपस्थित होते. पोलिसांना नेहमी कायम सहाकार्य करणारे येथील महाबळेश्वर व सहयाद्रि ट्रेकर्स या दोन्ही संघटनेच्या जवानांचा सत्कार या वेळी जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |