मुंबई : मुंबई, ठाणेसारख्या मेट्रो शहरांमध्ये बेदरकारपणे मोटार सायकल चालवली (रॅश ड्रायव्हिंग) तर सरळ बाईक जप्त केली जाणार असून दंडही आजच्यापेक्षा जास्त भरावा लागणार आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षित असून त्यादृष्टीने तयारी करण्याचे आदेश सोमवारी झालेल्या रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले.
मुंबईत बेदरकारपणे बाईक चालवण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. द्रुतगती मार्गावर रात्रीच्या वेळी तर शर्यती लावणे, सायलेन्सर लावून मोठ्या आवाजात मोटारसायकल चालविणे असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अशा बाईक सरळ जप्त करता येतील का आअणि त्यासाठी किती दंड वाढवता येईल यावर विचार करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांसह संबंधित अधिकार्यांना रावते यांनी दिले.
गेल्या पाच वर्षांत राज्यातील अपघातांची संख्या निम्म्याने घटली असली, तरी अपघातांमध्ये मृत्यू पावणार्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे अपघातांमध्ये मृत पावणार्यांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना राबवण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कोरगांवकर, मुंबईचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) शहाजी उमाप, महामार्ग पोलीस अधिक्षक विजय पाटील, सार्वजनिक बांधकामचे मुख्य अभियंता प्रकाश इंगोले, अतिरिक्त परिवहन आयुक्त सतिश सहस्त्रबुद्धे, सहआयुक्त जितेंद्र पाटील यांच्यासह परिवहन, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, आरोग्य, शिक्षण आदी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विशिष्ट वयोमर्यादेनंतर वाहन चालवण्याच्या क्षमतांवरही मर्यादा येत असल्याने महाराष्ट्रात कोणतेही वाहन चालवण्यासाठी कमाल वयोमर्यादा ठरवण्यात येणार आहे. या संदर्भात परिवहन विभागाचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.
वाढत्या वयात दृष्टी क्षीण होते आणि प्रकृतीच्या इतर तक्रारीही वाढतात. त्यामुळेही अपघात होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे वाहन चालविण्यासाठी काही विशिष्ट उच्च वयोमर्यादा निश्चित करता येईल का, याबाबत अभ्यास करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
एकदा वाहन चालवण्याचा परवाना मिळाला की तो कायमचा असतो. त्यानंतर वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेण्याची गरज नाही अशी भावना रूढ झाली आहे. आता मात्र तुमच्याकडे असा परवाना असला तरी दर 5 वर्षांनी परिवहन विभाग 8 दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्याचा विचार करत आहे. वाहतुकीविषयी विविध प्रश्नांवर संशोधन करण्यासाठी राज्य शासनाची स्वतंत्र ङ्गवाहन संशोधन आणि प्रशिक्षण संस्थाफ सुरु करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिवाकर रावते यांनी दिल्या आहेत.
याशिवाय राज्यात खड्ड्यांमुळे होणार्या अपघातांचे प्रमाण अधिक असून याप्रकरणी संबंधीत रस्त्याच्या कंत्राटदारावर किंवा टोलवसुली करणार्या कंपनीवर जबाबदारी निश्चित करण्याची सूचना दिली आहे. प्रवासी वाहनांमधून टपावरुन किंवा डिक्कीमधून बेकायदेशीररित्या मालवाहतूक करणार्या वाहनचालकांचे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयाची कडक अंमलबजावणी केली जाईल.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |