सातारा : शिरवळ ता.खंडाळा येथील पत्रकार मुराद पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला करणा-या आणखी एकाला खंडाळा पोलीसांनी अटक केली आहे. जावेद मेहबूब मुल्ला (वय २३ रा. संतोषनगर ,कात्रज ,पुणे) असे अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. पत्रकारावर हल्ला करण्याकरिता सुपारी देणारा मुख्य सूत्रधार सद्दाम उर्फ भैय्या अमीर खान याचा व मोहसीन मुल्ला याचा अटकपूर्व व अटकेत असलेल्या हल्लेखोर दोघांचा जामीन अर्ज सातारा जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान, अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर मुख्य सूत्रधार सद्दाम उर्फ भैय्या खान हा फरार आहे.
याबाबतची खंडाळा पोलीसांनी दिलेली माहिती अशी कि, शिरवळ ता.खंडाळा येथील पत्रकार मुराद पटेल हे ११ एप्रिल रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात असताना एका वीटभट्टीलगत दोन दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी सत्तूर,चाकू,दगड यांच्यासह पत्रकार मुराद पटेल यांच्यावर अचानकपणे प्राणघातक हल्ला केला होता. यामध्ये पत्रकार मुराद पटेल हे गंभीर जखमी झाले होते. यावेळी सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाने ,सातारा शहर पत्रकार संघासह विविध स्तरातून या भ्याड हल्ल्याचा निषेध करत हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे केली होती.
यावेळी या हल्ल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने व शिरवळ पोलीसांनी केलेल्या तपासामध्ये शिरवळ येथील तडीपार गुंडाचा व जीएसटी अधिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वृत्तपत्रामध्ये बातम्या दिल्याच्या कारणावरून राग मनात धरत आझाद परमिट रुम या दारू दुकानाचा चालक सद्दाम उर्फ भैय्या खान याने पुणे येथील हल्लेखोरांना पत्रकार मुराद पटेल यांना जीवे मारण्याची सुपारी दिल्याचे पोलीसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले होते. यामध्ये घटना घडल्यापासून मुख्य सूत्रधार सद्दाम उर्फ भैय्या खान हा फरार झाला होता तर याप्रकरणी हल्लेखोरांपैकी इस्माईल मौल्लाली मकानदार (वय २५), रोहन रोहिदास पवार (वय २२ ,दोघे रा. संतोषनगर ,कात्रज पुणे ) यांना पोलीसांनी शिताफीने अटक केली होती. याप्रकरणी सध्या दोघेही कळंबा कारागृह याठिकाणी न्यायालयीन कोठडीत आहे.त्याचप्रमाणे हल्लखोरांपैकी मोहसीन मेहबूब मुल्ला , शेखर ठोंबरे , शफिक अब्दुल नगराळे-शेख (सर्व रा. संतोषनगर ,कात्रज,पुणे) हे तीन हल्लेखोर घटनेपासून अद्यापही फरार असून त्यांचा शोध पोलीसांकडून सुरु आहे तर जावेद मुल्ला याला पुणे पोलीसांनी पत्रकार मुराद पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी जेरबंद केल्यानंतर खंडाळा पोलीसांनी ताब्यात घेत अटक केली होती. यावेळी जावेद मुल्ला याला खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने शुक्रवार दि. ११ जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मुख्य सूत्रधार सद्दाम उर्फ भैय्या खान याने सातारा जिल्हा न्यायालयातून २९ मे रोजी तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळविला होता. यावेळी सद्दाम उर्फ भैय्या खान याने याप्रकरणी अंतरिम जामीन मिळविण्यासाठी सातारा जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणी होत अतिरिक्त सातारा जिल्हा न्यायाधीश बी.एस.वावरे यांनी मुख्य सूत्रधार सद्दाम उर्फ भैय्या खान याचा अटकपूर्व जामीन व हल्लेखोर मोहसीन मुल्ला याचा अटकपूर्व जामीन अर्ज व अटकेत असलेले हल्लेखोर इस्माईल मकानदार व रोहन पवार यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. दरम्यान, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुख्य सूत्रधार आझाद परमिट रूम चालक सद्दाम उर्फ भैय्या खान हा फरार झाला आहे. या घटनेचा अधिक तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड हे करत आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |