सातारा : महाराष्ट्र शासनाच्यावतीने पत्रकारितेसाठी पुणे विभागातून देण्यात येणारा २०१८ चा नानासाहेब परुळेकर पत्रकारिता पुरस्कार 'दैनिक पुण्यनगरी'चे सातारा कार्यालयातील उपसंपादक मोहन मारुती मस्कर-पाटील यांना जाहीर झाला असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केली. ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून शनिवारी, दि. २७ रोजी सायंकाळी चार वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. दरम्यान, पत्रकारितेत उल्लेखनीय काम केल्याबद्दल देण्यात येणारे २०१८ चे राज्यस्तरीय आणि विभागनिहाय पुरस्कार मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.
मोहन मारुती मस्कर-पाटील मूळचे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चिंचेवाडी येथील असून गेली साडेचार वर्षे 'दैनिक पुण्यनगरी'च्या सातारा आवृत्तीमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. 'नकुसा होणार लाडकी' हे अभियान त्यांनी जागतिक स्तरावर पोहोचवले. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी त्याची दखल घेतली. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सातारा जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाने नकुसा मुलींची नावे बदलून त्यांना नवी ओळख दिली. या विषयावर सातत्याने तीन वर्षे लेखन केल्यामुळे त्यांना 'लाडली मीडिया अवॉर्ड'ने गौरवण्यात आले. विकास पत्रकारिता, कृषी विकास, आंदोलन, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, महिला सबलीकरण हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय आहेत. त्यांना यापूर्वी सीएसई (दोनवेळा) तसेच अनिल अग्रवाल, रिच-लिली, एनएफआय, पॉप्युलेशन फर्स्ट-लाडली, युनिसेफ-हर्ड, रिच-एनसीडी या राष्ट्रीय स्तरावरील माध्यम शिष्यवृत्तीने (मीडिया फेलोशिप) गौरवण्यात आले आहे. राज्य शासनाचा महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार, यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्ती पुरस्कार त्यांना मिळाला आहे. दरम्यान, शनिवारी मुंबईत होणाऱ्या समारंभात २०१६ आणि २०१७ या सालातील पत्रकारिता पुरस्कारांचे तसेच ‘महाराष्ट्र माझा शेतकरी राजा’ लघुचित्रपट स्पर्धा २०१६ आणि ‘महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा’ २०१७ आणि २०१८ यातील विजेत्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |