02:53am | Jan 05, 2020 |
कराड : जम्मू-काश्मीर येथील नौशेरा सेटर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले मुंढे (ता. कराड) गावचे सुपूत्र हुतात्मा संदीप सावंत यांच्या कुटुंबीयांना कृष्णा सहकारी बँकेच्यावतीने 1 लाख रूपयांची मदत करण्यात आली. बँकेचे चेअमरन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी एक लाख रूपये मदतीचा धनादेश वीरपत्नी श्रीमती स्मिता संदीप सावंत यांच्याकडे सूपुर्द केला. शहिदांच्या वारसांना सर्वांत प्रथम मदत करून कृष्णा सहकारी बँकेने आपली सामाजिक बांधिलकी जपत, समाजासमोर एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे.
मुंढे येथील शहिद जवान संदीप सावंत यांना शुक्रवारी (ता.3) शासकीय इतमामात कराडकरांनी साश्रूनयनांनी निरोप दिला. देशासाठी वीरमरण पत्करलेल्या या जवानाच्या स्मृतींनी संपूर्ण कराड तालुकाच नव्हे सातारा जिल्हा शोकाकुल बनला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी मुंढे येथील त्यांच्या गावी अनेक नागरिक भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन करत आहेत. आज शनिवारी (ता.4) कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शहिद सावंत यांच्या मुंढे येथील निवास्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून कृष्णा बँकेच्यावतीने 1 लाख रूपयांचा मदतीचा धनादेश वीरपत्नी श्रीमती स्मिता सावंत यांच्याकडे सुपूर्द केला.
हुतात्मा संदीप सावंत यांनी देशासाठी दिलेले हे बलिदान महत्वपूर्ण असून, सावंत कुटुंबीयांच्या दु:खात कृष्णा परिवार सहभागी आहे. या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबतची विनंती राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरकारला करणार असल्याचे सांगून, डॉ.अतुलबाबा भोसले यांनी कृष्णा समूहाच्या माध्यमातून सावंत कुटुंबाला लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी कृष्णा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कापसे, व्यवस्थापक भगवानराव जाधव, सरपंच रमेश लवटे, कराड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, पैलवान तुकाराम घोडके, आप्पा मोरे, जयसिंग गावडे, अशोक जमाले, संभाजी जमाले, नाथा सावंत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |