06:18pm | Aug 11, 2018 |
पुणे : रियल इस्टेट क्षेत्रातील मातब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील गोयल गंगा डेव्हलपर्स या कंपनीला सर्वोच्च न्यायालयाने तब्बल १०५ कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे. पर्यावरणाची हानी केल्याबद्दल न्यायालयाने गोयल गंगाला हा दणका दिला आहे. आलिशान इमारती उभारताना कायद्याचे उल्लंघन करणे आणि पर्यावरणाचे नुकसान केल्याचा या कंपनीवर आरोप आहे. महत्त्वाचे असे की, या इमारती पाडण्याचे कोणतेही आदेश न्यायालयाने कंपनीला दिले नाहीत. कारण, इमारतीमधील फ्लॅ्टस ग्राहकांना विकले गेले आहेत. त्याची संख्या मोठी आहे.
अन्यथा कंपनीची मालमत्ता होणार जप्त
न्यायधीश बी लोकूर आणि दीपक गुप्ता यांच्या बेंचने कंपनीला दंडाची रक्कम जमा करण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयात म्हटले आहे की, कंपनीने जर दंडाची रक्कम भरली नाही. तर, कंपनीची सर्व मालमत्ता जप्त केली जाईल. पुढे, न्यायालयाने म्हटले की, कंपनीने ज्या इमारती उभारल्या आहेत त्या पर्यावरण क्लियरंन्सचे उल्लंघन आहे. कंपनीने इमारतींची उभारणीही बेकायदेशीर केली आहे. कंपनीने ७३८ फ्लॅट्स आणि १५ दुकानांचे पुणे येथील सिंहगड रोडवर बांधकाम केले आहे.
ग्राहकांना ९ टक्के व्याजदराने परतावा मिळणार
न्यायालयाने नॅशनल ग्रीन ट्रायब्यूनलचा आदेशही कायम राखला आहे. ज्यात डेव्हलपरला कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आहे. सोबतच दंडही आकारला आहे. आदेशात म्हटले आहे की, कंपनीला आता पुढच्या दोन इमारती बांधण्याची मान्यता देण्यात येणार नाही. या इमारतींमद्ये ४५४ फ्लॅट्स बांधले जाणार होते. महत्त्वाचे असे की, न्यायालयाने गुंतवणूकदारांचे पैसे ९ टक्के व्याजदराने परत करण्याचे आदेशही कंपनीला दिले आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |