06:31pm | Aug 20, 2019 |
सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ब्लू फोर्सने निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात धोत्रे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली असून कर्मचार्यांशी उद्धट वर्तन करत असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. धोत्रे यांच्या कारभाराची आणि त्यांच्या कालावधीत घेण्यात आलेल्या निर्णयांची गोपनीय चौकशी करण्यात यावी, अन्यथा मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी निवेदनात म्हटले आहे की, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्याशी निगडीत असणार्या प्रत्येक कामाचे वितरण शंकास्पद आहे. सातारा जिल्हा परिषद बांधकाम समितीचे अध्यक्ष व समाजकल्याण समितीच्या सर्व योजनांचा निधी तसेच अन्य निधीचे वितरण, कामवाटप आदींवर तांत्रिकदृष्ट्या तपासनीस म्हणून धोत्रेच आहेत. असे असताना शिक्षण, आरोग्य, ल.पा. चे कर्मचारी त्यांच्या दालनात आल्यास धोत्रेंकडून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. महिला कर्मचार्यांशीही ते अश्लिल आणि उद्धट बोलत असतात. काही कर्मचार्यांनी धोत्रेंच्या या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवल्यास त्यांना निलंबनाची धमकी दिली जाते. अशा भ्रष्ट व व्यभिचारी अधिकार्यावर कारवाई करण्यात यावी तसेच बांधकाम समितीविरोधात कोणताही सभापती, अध्यक्ष, आमदार अथवा सदस्यांची तक्रार नसताना धोत्रेंनी 3-4 वेळा बांधकाम समिती सचिव बदलून मनमानी कारभार केला आहे. यामध्ये त्यांनी बराचसा मलिदा हाणलेला आहे. गट अ, ब आणि क या योजनांमध्ये संबंधित शाखा अभियंत्यांना धमकावून तसेच कागदोपत्री काम दाखवून लाखो रुपयांची बिले काढली आहेत. अशा भ्रष्ट अधिकार्याच्या कार्यपद्धतीची चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन ब्लू फोर्सचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सफाई कर्मचार्यांना स्वतःच्या कामासाठी वापरले. . !
सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यावर ब्ल्यू फोर्सने विविध आरोप केले आहेत. त्यामध्ये म्हटले आहे की, धोत्रे यांनी अधिकाराच्या जोरावर जिल्हा परिषदेत असणारे सुरक्षा रक्षक कर्मचारी आपल्या खाजगी निवासस्थानी कामाला लावले. तसेच सफाई कर्मचार्यांकडून खासगी बंगल्याची साफसफाई केली. विशेष म्हणजे खेड ग्रामपंचायतीच्या सफाईकर्मचार्यांना घरीधुणे, भांडी करण्यासाठी वपारले. धोत्रे यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करत स्थानिक स्वराज्य संस्थांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी झालीच पाहिजे. त्यांच्या कालावधीत त्यांनी केलेली सर्व कामवाटप, आदेश, सचिवांच्या बदल्या तसेच ज्या महिलांना कर्मचार्यांचा त्यांनी अपमान केला त्यांचा गोपनीय जबबा घेण्यात येवून त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी. दरम्यान, याकडे दुर्लक्ष केल्यास अथवा त्यांची चौकशी न झाल्यास रिपब्लिकन पक्षाच्या ब्ल्यू फोर्सच्यावतीने मुंबईत आझाद मैदानावर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे .
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |