सातारा : सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी व सातारा पोलीस कल्याण निधीअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नवीन क्रीडा लाल मातीतील कुस्ती आखाडा आजपासून नव्याने कुस्ती मल्लांसाठी सुरु करण्यात आला आहे याचे उद्घाटन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक अंकुश यादव, पोलीस कल्याणचे श्री. वाघ, जिल्हा क्रीडा प्रबोधिनीचे व्यवस्थापक शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे. पोलीस व पोलिसांच्या कुटुंबीयांना आणि नागरिकांकरिता लाल मातीतील कुस्ती हा उपक्रम नव्याने सुरु करण्यात आला आहे. पोलीस क्रीडा प्रकारांमध्ये जुदो, बॉक्सिंग, आर्चरी, मल्लखांब, कुस्ती, फुटबॉल, व्हॉलीबॉल यासह विविध खेळांचे प्रशिक्षण वर्ग सुरु आहेत. प्रबोधिनीचे उपक्रम सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत विविध खेळ प्रकारातील खेळाडूंनी तालुकास्तरावर व राज्यस्तरापर्यंत 185 पेक्षा जास्त पारितोषिके मिळविले आहेत. तरी इच्छुक खेळाडूंनी सातारा पोलीस क्रीडा प्रबोधिनीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.
वाद-विवाद स्पर्धा संपन्न
सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचे सुरक्षिततेसाठी कठोर कायद्याऐवजी सामाजिक दृष्टीकोन बदलणे आवश्यक या विषयावर इयत्ता 11 वी व 12 वी वर्गामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नुकतीच वाद-विवाद स्पर्धा अलंकार हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. या वाद-विवाद स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयुट ऑफ सायन्स, सातारा, द्वितीय क्रमांक विभागून वेणुताई चव्हाण कॉलेज, कराड व काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले तर तृतीय क्रमांक धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा यांनी मिळविला.
यावेळी स्पर्धेतील विजयी संघास व सहभागी संघास सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |