02:47pm | Sep 15, 2019 |
कराड : काले गावातील विकासासाठी मी मुख्यमंत्री झाल्यापासून आतापर्यंत केलेल्या कामांचे व पाठपुराव्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. ते कधीही मी जनतेला बघायला देतो. परंतु विरोधकांनी आमच्याच विकासकामांचे नारळ फोडले, याचेच विशेष वाटते. त्यांनी आमच्या कामाचे श्रेय घेवू नये, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
काले (ता. कराड) येथे आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली एकूण 11 कोटींची विकासकामे, दक्षिण मांड नदीवरील पुलाची पाहणी तसेच मुस्लीम समाजाच्या बैठकप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, पैलवान नानासाहेब पाटील, जखिणवाडीचे आदर्श सरपंच ऍड. नरेंद्र नांगरे-पाटील, शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात, कृष्णराव थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
पैलवान नानासाहेब पाटील म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी आजपर्यंत दुसऱयाने केलेल्या कामाचे श्रेय कधीच घेतलेले नाही. त्यांनी ज्या कामांसाठी पाठपुरावा केला. ती कामे मंजूर झाल्यानंतर व तिची प्रशासकीय मान्यता घेतल्यानंतरच ते कामाचे भूमिपूजन करतात. परंतु विरोधकांचे भाजप सरकार हे जणू त्यांना आपल्या घरातील पार्टी असल्यासारखे वाटत असल्याने पृथ्वीराजबाबांनी केलेल्या कामांचे नारळ फोडणारी मंडळी जनतेच्या विश्वासास अपात्र आहेत. हे त्यांना येत्या निवडणूकीत समजेल. यावेळी मुस्लीम समाजबांधवांबरोबर झालेल्या बैठकीत कॉंग्रेसच्या पाठिशी एकमुखी राहणार असल्याची ग्वाही समाजाच्यावतीने देण्यात आली. कार्यक्रमास शंकर यादव (गुरुजी), भगवान यादव, आनंदराव पाटील (आण्णा), प्रल्हाद पाटील, किरण पाटील, संतोष पाटील, युनूस मुल्ला, रमजान शेख, विकास देसाई, ग्रामपंचायत सदस्य अरुण यादव, इंद्रजीत गुरव, सौ. यादव, माणिक यादव, सतीश चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |