सातारा : श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 2 जुलै ते 6 जुलै 2019 अखेर सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असून सदर पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात दि. दि. 2 जुलै ते 6 जुलै 2019 रोजी पाडेगाव, लोणंद यथे प्रवेश करणार असून त्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करुन दि. 6 जुलै 2019 रोजी सोलापूर जिल्ह्यात जाणार आहे. सदरचा पालखी सोहळा हा निरा लोणंद फलटणमार्गे पंढरपूर रस्त्याने जाणार असल्याने तसेच पालखी सोहळयात लाखो भाविक सहभागी होणार असल्याने पालखी जाणारे मार्गावर कोणताही अपघात घडु नये अथवा अनुचीत प्रकार घडू नये याकरिता पोलीस अधिक्षक सातारा महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 34 प्रमाणे प्राप्त अधिकारान्वये पालखी सोहळयातील वाहनांखेरीज व अत्यावश्यक सेवेतील खेरीज करुन इतर सर्व वाहनांना निरा लोणंद पंढरपूर मार्गावर दि. 2 जुलै ते 6 जुलै 2019 या कालावधीत खाली नमुद केल्याप्रमाणे प्रवेश करण्यास मनाई मनाई करण्यात आली आहे.
दि. 1 जुलै रोजी 6 ते 3 जुलै रोजी 10 पर्यत फलटण येथून निरा लोणंदकडे येणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून येणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पुण्याकडे शिरगाव घाटातून वळविण्यात येत आहे.
दि. 1 जुलै रोजी 7 वा पासून ते 2 जुलै रोजी 22 वा. पर्यंत आदर्की फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळयातील येणारे वाहनाखेरीज इतर वाहनांना बंद करण्यात येत आहे.
दि. 1 जुलै रोजी 9 पासून ते 3 जुलै रोजीचे 13 पर्यंत लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदर्की मार्गे फलटणकडे वळविण्यात येत आहे.
दि. 2 जुलै रोजी 0 वा. ते दि. 4 जुलै रोजीचे 24 वा. पर्यंत फलटण ते लोणंद या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.
दि. 5 जुलै रोजी 0 पासून ते दि. 6 जुलै रोजी 16 वा पर्यंत फलटण ते नातेपुते जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.
दि. 5 जुलै रोजी 0 पासून ते 6 जुलै रोजी 16 वा. नातेपुते कडून पुणे बाजुकडे जाणारी वाहतूक बारामती पुल येथून बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.
दि. 5 जुलै रोजी 0 पासून ते दि. 6 जुलै रोजीचे 16वा. पर्यंत नातेपुतेकडून फलटण मार्गे साताराकडे जाणारी वाहतुक शिंगणापूर तिकाटणे दहिवडी-सातारा अशी वळविण्यात येत आहे. नातेपुते कडून पुण्याकडे जाणारी वाहतूक नातेपुते-दहिगाव-जांब-बारामती मार्गे पुण्योकडे वळविण्यात येत आहे.
दि. 4 जुलै रोजी 0 पासून ते दि. 6 जुलै रोजीचे 14 पर्यंत नातेपुते-वाई-वाठारकडे जाणारी वाहतुक शिंगणापूर तिकाटण-शिंगणापूर-जावली-कोळकी-झिरपवाडी-विंचुर्णी-ढवळपाटी-वाठार फाटा मार्गे वळविण्यात येत आहे.
दि. 5 जुलै रोजी पालखी सोहळा हा फलटण येथून पुढील बरड येथील मुक्कामी सकाळी 6 वा. मार्गस्थ होणार आहे सदर वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणुन पालखीतील वाहने फलटण ते पंढरपूर रोडने बरडकडे जाण्याऐवजी फलटण-दहिवडी चौक-कोळकी शिंगणापूर तिकाटणे-वडले-पिंप्रद-बरड अशी वळविण्यात येत आहे.
पालखी सोहळा दरम्यान पालखी मार्गावरील पालखी सोहळयातील वाहनाखेरीज इतर सर्व वाहने पर्यायी मार्गाने ये-जा करतील याची इतर वाहनधारकांनी नोंद घ्यावी.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |