04:50pm | Jun 30, 2018 |
मंदसौर (मध्य प्रदेश) : पुन्हा एकदा देश गँगरेपने हादरला आहे. मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये सात वर्षीय मुलीवर गँगरेप झाला. नराधमांनी हे कृत्य करत चिमुकलीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. सध्या या चिमुकलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. या बलात्कारानंतर मध्य प्रदेशातील जनता रस्त्यावर उतरत आहे.
मंदसौरमध्ये 26 जून रोजी पीडित चिमुकलीचं शाळा सुटल्यानंतर अपहरण केलं होतं. या मुलीला चॉकेलट-कॅण्डीचं आमिष दाखवून तिला अज्ञातस्थळी घेऊन गेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर तिच्या गळ्यावर वार करुन अर्धमेलं करुन झाडीत फेकून दिलं.
पीडित चिमुकली तिसरीत शिकते. तीचं अपहरण झाल्याची तक्रार केल्यानंतर, पीडितेची शोधाशोध घेण्यात आली. त्यावेळी ती शहरातील बस स्टॅण्डजवळ एका झाडीत जखमी अवस्थेत आढळली. तिला तातडीने इंदोरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या ती जीवन-मृत्यूचा सामना करत आहे.
याप्रकरणातील आरोपी इरफानला 27 जूनला आणि आसिफला 29 जूनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इरफानला 2 जुलैपर्यंत रिमांड रुममध्ये पाठवलं आहे.
आरोपींना फाशी द्या, कब्रस्तान देणार नाही: मुस्लिम समाज
या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उठली आहे. मुस्लिम समाजानेही आक्रमक पवित्रा घेत, आरोपींना फाशीची मागणी केली आहे. तसंच त्यांच्या मृतदेहांना दफन करण्यासाठी कब्रस्तानामध्ये जागा देणार नाही, अशी घोषणाही मुस्लिम समाजाने केली.
आरोपींना फाशीच होईल: मुख्यमंत्री
याप्रकरणी आरोपींना फाशी देण्याची मागणी होत असताना, स्वत: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही आरोपींना फाशीच होईल, असा विश्वास व्यक्त केला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |