12:01am | Sep 02, 2018 |
सातारा : गिरवी, ता. फलटण येथील चाहूर नावाच्या शिवारात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गुरांसाठी मका आणावयास गेलेल्या बाप-लेकीवर धारदार कुर्हाडीने वार करुन त्यांचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडल्यामुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, संशयित आरोपीने विष प्राशन करुन आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गिरवी, ता. फलटण येथील किरण उर्फ पका भुजंगराव कदम (वय 32) व त्यांची लहान मुलगी कार्तिकी किरण कदम (वय 3) हे गुरांना चार्यासाठी मका कापण्यासाठी चाहूर नावाच्या शिवारात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गेले होते. दरम्यान, दुपारपर्यंत हे दोघे घरी न आल्यामुळे कुटूंबियांनी त्यांची शोधाशोध सुरु केली. यावेळी कुटूंबियांनी चाहूर शिवारात धाव घेतल्यानंतर मक्याच्या पिकात त्यांना रक्त आढळून आले. तसेच शेजारच्या कोरड्या विहिरीपर्यंत काहीतरी फरफटत नेलेले आढळून आले. यावेळी विहिरीच्या काठावरही रक्त दिसून आले. त्यामुळे काही युवक विहिरीत उतरल्यानंतर सकाळपासून बेपत्ता असलेले किरण व कार्तिकीचे धारदार शस्त्राने वार केलेले मृतदेह मिळून आले. याबाबतची खबर तत्काळ फलटण ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह ताब्यात घेवून त्यांचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. गिरवी येथे बाप-लेकीच्या या दुहेरी हत्त्याकांडामुळे फलटणसह सातारा जिल्हा हादरुन गेला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत पाटील यांनी भेट दिली असून नातेवाईकांना शांततेचे आवाहन केले आहे. दरम्यान, संशयित आरोपी आकाश सदाशिव कदम हा मृत किरण कदम यांचा चुलत भाऊ असल्याचे समोर आले आहे. त्यानेही विष प्राशन करुन आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, संशयित आरोपीने हे हत्त्याकांड का घडवले, याबाबतचा तपशील अद्याप समजू शकला नाही. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलीस तपासामध्ये खुनाचे कारण स्पष्ट होईल मात्र, याबाबत पोलीसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. याबाबत गुन्हा नोद करण्याचे काम फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरु आहे. याबाबतचा अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हंकारे करीत आहेत. या घटनेमुळे गिरवीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गिरवी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |