10:16pm | Apr 19, 2024 |
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा जोरदार चुरशीचा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीने शरद पवार समर्थक शशिकांत शिंदे यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या प्रचारासाठी सातारा जिल्ह्यातील ठाकरे गटाचे शिलेदार सक्रिय झाले असून महाविकास आघाडीचा उमेदवार पूर्ण ताकतीने निवडून देण्याची ग्वाही जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिली.
करहर, तालुका जावळी येथे शिवसेनेच्या पदाधिकार्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला उपजिल्हाप्रमुख विश्वनाथ धनावडे, शिवसेना पदाधिकारी सादिक बागवान, महिला संघटक सुनंदा महामुलकर, तालुकाप्रमुख नितीन गोळे, उमेश दुर्गवळे, प्रकाश गोळे, रवी पत्रे, सारिका गुजर, युवासेना अध्यक्ष जीवन शिंदे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
महाविकास आघाडीने जो उमेदवार दिला आहे त्याचा पूर्ण ताकतीने प्रचार करावयाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे, असे मोहिते यांनी सांगितले. ही सर्व प्रचार यंत्रणा शिवसेना उपनेते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबणार आहे. शिवसेनेच्या वतीने प्रचार मेळावे, घरटी संपर्क अभियान, त्याचबरोबर उद्धव ठाकरे सरकारने गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घेतले ते लोकांपर्यंत पोहोचवणे तसेच प्रत्येक मतदार संघामध्ये बूथ लेवल पर्यंत काम करून त्याचे सशक्तीकरण, मजबुतीकरण तसेच सेना सभासदांची संख्या वाढवणे इत्यादी कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने सातार्यात भव्यशक्ती प्रदर्शन करण्यात आले होते. त्यावेळेला सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने यामध्ये हिरीरीने भाग घेतला होता. यापुढे महाविकास आघाडीच्या सर्व प्रचार मोहिमांमध्ये आम्ही अग्रभागी राहणार असल्याचे आश्वासन सचिन मोहिते यांनी दिले आहे.
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |