- विनित जवळकर.
आज दि. 12 मे रोजी संपूर्ण जगतात मदर्स डे साजरा करण्यात येत आहे. मदर्स डे म्हणजेच ‘मातृ दिन’. यानिमित्ताने मनात येणार्या प्रश्नांना समाजासमोर उतरविण्यासाठी केलेला हा प्रपंच.
मातृदिन? का मातृदिन एकच दिवसाचा? उर्वरित 364 दिवस त्या माऊलीला विसरावेत का? तसे पहायला गेले तर मी मातृदिन हा मानतच नाही. कारण कोणताही डे म्हणजे फक्त त्याच दिवशी संबंधिताची आठवण काढायची, हे मनाला पटतच नाही. त्याच दिवशी त्या व्यक्तीची आठवण काढायची, त्यासाठी गळे काढायचे आणि उर्वरित दिवस त्यांना विसरायचे? फक्त मातृदिनीच त्या माऊलीचे फोटो स्टेटस वर ठेवून तिच्यावर आपण किती प्रेम करतो, हे समाजाला दाखवण्याचा अट्टाहास. जर तुमचे खरेच तुमच्या आईवर नितांत प्रेम असेल तर ते प्रभू श्रीरामांसारखे करा. की ज्यांनी केवळ आईच्या शब्दासाठी 12 वर्षे वनवास पत्करला. आई-वडिलांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात श्रीकृष्णांनी मामा कंसाचा वध केला.
आई या शब्दातच सर्व काही येते. आई म्हणजेच प्रेम, वात्सल्य, माया आणि आपल्या अपत्यासाठी कोणताही त्याग करण्यासाठी सदैव तत्पर असलेली स्त्री. आई हीच आपली पहिली गुरू, पहिली मैत्रीण आणि सगळंच असते. आपण तिच्यासमोर काहीही बोललो तरी ती आपल्याला कधीच जज करत नाही. जेव्हा जेव्हा आपल्याला दुखापत किंवा वेदना होतात, तेव्हा आपल्या तोंडातून पहिला शब्द बाहेर पडतो तो म्हणजे आई. आई शिवाय जग नसते. आईचे प्रेम प्रत्येक नात्याच्या आधी आणि वर असते.
आत्ताच्या घटकेला काही अपवाद सोडले तर मुलांचे लग्न झाले की येणार्या मुलीचे आणि तिच्या सासूचे काही कालावधीनंतर मतभेद होतात. यावर उपाय म्हणून मुलगा आपल्या पत्नीला घेवून स्वतंत्र राहतो. त्यातही त्याची एकच कल्पना असते की सासू-सुनांमधील भांडणाचा अंत व्हावा आणि संसारात शांतता रहावी. मात्र, पत्नीसोबत राहतानाही तो आपल्या जन्मदात्रीला खचितच विसरत नाही. आताच्या घटकेला नोकरदार महिलांचीही अवस्था तशीच असते. ‘घार उडे आकाशी, लक्ष तिचे पिलांपाशी’ तद्वतच ऑफिसचे काम करतानाही मनाच्या एका कोपर्यात आपल्या बाळाची आठवण त्यांना होतच असते.
तद्वतच शिक्षण, नोकरीसाठी बाहेर असणारी मुले रोजच आपल्या माता-पित्यांच्या आठवणीत रमत असतात. पण ती फक्त काही बोलू शकत नाहीत. कारण शिक्षण आणि नोकरीपुढे त्यांचाही नाईलाज असतो. सद्य परिस्थितीत आपल्या आईवर प्रेम करीत नसेल, अशी अवलादच नसेल. मात्र केवळ आई-आई न करता बाह्य परिस्थितीबरोबर दोन हात करुन परिवाराचे भले करणारीही मुले-मुली आहेत.
तसे पहायला गेले तर आईवरील प्रेम दाखवण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे का? किंवा एकच दिवस का? आईचे प्रेम, ममता, वात्सल्य, पाठिंबा, बळ यासाठी केवळ मातृदिन हा एक दिवस पुरेसा नाही. मात्र, यांसारखे प्रश्न, शंका दूर सारून आजकाल तरुणाई मदर्स डे अगदी उत्साहाने साजरा करताना दिसते. ती जननी अगदी अशिक्षित जरी असली तरी ती असते अनुभवांची अधिष्ठाता, संस्कारांची कुलगुरू नि स्वयंभू मुक्त विद्यापीठही असते.
आईचे आपल्या आयुष्यातील स्थान अगदी अनन्यसाधारण असते. गरीब- श्रीमंत, साक्षर-निरक्षरतेसारख्या कोणत्याही चौकटीत 'आई' नावाची व्याख्या अडकत नाही. तिचे महत्त्व, महती व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. दुःखाचा डोंगर कोसळलेला असो की सुखाचा वर्षाव होत असो, मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो कि आठवणीतले तारे लुकलुकत असोत, आठवते ती फक्त आई. अनेक थोरामोठ्यांनी आपल्या लेखणीतून आईची थोरवी शब्दात मांडली आहे. ‘स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी’ ही कवी यशवंत पेंढारकर यांची वाक्ये आईची महती आणखीनच वाढवतात.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |