नवी दिल्ली: लोकसभेत वादळी चर्चेनंतर सोमवारी राष्ट्रीय तपास यंत्रणा (सुधारणा) विधेयक २०१९ मंजूर झाले. या विधेयकामुळे आता राष्ट्रीय तपास यंत्रणेला एखाद्या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी परदेशातही तपास करण्याचे अधिकार मिळाले आहेत.
दहशतवादाचा विदेशातही सामना करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) अधिक अधिकार देण्यासाठी मोदी सरकारने लोकसभेत मांडलेल्या दुरुस्ती विधेयकावर सोमवारी विरोधी पक्षांची कोंडी झाली. विधेयकातील तरतुदींना विरोध केल्यानंतर मतविभाजनाच्या मागणीमुळे काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांना विधेयकाच्या बाजूने मतदान करावे लागले. त्यामुळे लोकसभेत हे विधेयक २७८ विरुद्ध ६ अशा फरकाने मंजूर झाले. हे विधेयक आता राज्यसभेत मांडले जाईल.
सभागृहात या विधेयकासंदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देताना गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले, 'आज देश तसेच जगासमोर दहशतवादाचे संकट आहे. अशा वेळी एनआयए सुधारणा विधेयकाचं उद्दिष्ट तपास संस्थेला राष्ट्रहितासाठी बळकट बनवणं हा आहे.' दरम्यान, याच विधेयकाच्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार ओवेसी यांच्यात लोकसभेत जोरदार खडाजंगी झाली.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले, 'या कायद्याचा उपयोग दहशतवाद नष्ट करण्यासाठी केला जाईल, मात्र कुठल्या धर्माला लक्ष्य करण्यासाठी या कायद्याचा वापर केला जाणार नाही.' राष्ट्रीय तपास संस्थेची स्थापना २००९ मध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर झाली. दहशतवादाशी संबंधित नवनव्या आव्हानांचा एनआयए अधिक जोमाने मुकाबला करू शकेल यासाठी या संस्थेला अधिक अधिकार असावेत यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय २०१७ सालापासून प्रयत्न करत आहे.
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |