एस एस मोबाईल आणि ईलेक्ट्रॉनिक्स ही सर्व प्रमुख बॅ्रंडसच्या ‘राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय’ स्मार्टफोन आणि जवळपास सर्वच प्रकारच्या गॅझेट आणि ऍक्सेसरीज साठी महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची रिटेल चैन आहे. आणि त्यासाठी 500 हून अधिक उत्साही आणि होतकरू लोक काम करत आहेत. एस एस मोबाईल आणि ईलेक्ट्रॉनिक्स चे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत 60 हून अधिक स्टोअर्स आहेत़ जे जवळपास 30 लाखांपेक्षा जास्त ग्राहकांच्या गरजा पूर्ण करत आहेत आणि ही तर फक्त अजुन सुरूवात आहे. एकदम सोईस्कर ठिकाणी असलेली स्टोअर्स ही सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी पर्वणी आहे.
आघाडीचे उदयोजक सिद्धार्थ शाह यांनी वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी एस एस मोबाईल आणि ईलेक्ट्रॉनिक्स ची सुरूवात केली.आणि तिथुन आज 16 वर्षांनंतर एस एस मोबाईल आणि ईलेक्ट्रॉनिक्स महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये 30 हून अधिक शहरांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. हा बिझनेस अजून वाढवण्याच्या मार्गावर पुढे जात असून थोडयाच काळात 500 कोटींचा टप्पा गाठण्याचा त्यांचा मनसुबा आहे. तसेच इतर भागातील ग्राहकांना एस एस मोबाईल आणि ईलेक्ट्रॉनिक्सच्या खास सवलती आणि ऑफर्सचा फयदा घेता यावा यासाठी 100 पेक्षा जास्त स्टोअर्सपर्यंत आपला व्याप वाढवण्याचा एस एस मोबाईल आणि ईलेक्ट्रॉनिक्सचा विचार आहे. ग्राहकांच्या सोईसाठी सर्व स्टोअर्स महाराष्ट्रातील अनेक शहरांच्या प्रमुख ठिकाणी उपलब्ध आहेत. प्रत्येक स्टोअरमध्ये तांत्रिकदृष्टया प्रशिक्षित आणि कामासाठी उत्साही समर्पित टीम ग्राहकांना त्राासरहित आणि सुंदर, आरामदायक अनुभव देण्यासाठी उपस्थित आहे. सर्व फोन आणि गॅझेटचा खरा खुरा अनुभव खरेदीआधी देण्यासाठी लाइव डेमोची एक मोठी रेंज ठेवण्यात आली आहे. जिथे जवळपास सगळया ब्रॅन्डसना युक्त्या आणि प्रचंड मार्केटींगची गरज पडते तिथेच एस एस मोबाईल आणि ईलेक्ट्रॉनिक्सचे ऑफर्स आणि उत्कृष्ट कस्टमर सर्व्हीस ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पुरेसे आहेत.
एस एस ने ग्राहकांसाठी दिलेले काही उत्कृष्ट पर्याय :
नवीनीकृत स्मार्टफोन : जवळपास अर्ध्या किमतीत ब्रॅन्डेड फोन आणि तेही सहा महिन्यांच्या वॉरंटीसहित. नवीनीकृत ‘रिफर्बीश्ड’ मोबाईल हे नवीन मोबाईलपेक्षा स्वस्त असतात आणि ज्यांना एक ठराविक ब्रॅन्ड खरेदी करण्यासाठी पुरेसे बजेट नाही़ त्यांच्यासाठी एस एस मोबाईल आणि ईलेक्ट्रॉनिक्स हे फोन अगदी कमी किमतीत देत आहेत आणि तेही सहा महिन्यांच्या वॉरंटी सहित.
सर्व प्रमुख ब्रॅन्ड्स, स्मार्ट टी.व्ही. : 9990 रूपयांच्या किमतीपासून सुरू होणार्या स्मार्ट टी.व्ही. ची नवीन रेंज ग्राहकांसाठी बाजारात आणली आहे आणि ग्राहकांना आपली लिवींग रूम सुंदर करण्याची संधी एस एस मोबाईल आणि ईलेक्ट्रॉनिक्सने दिली आहे. एस एस ने ग्राहकांना आपला टी.व्ही. अपडेट करण्याची एक सुवर्णसंधी दिली आहे तेही स्मार्टफोनपेक्षाही कमी किमतीत आणि एक वर्षाच्या रिप्लेसमेंट वॉरंटीसह.
इजी रिपेअर : महाराष्ट्रात पहिल्यांदाच एक वर्षाच्या वॉरंटीसोबत मोबाईल रिपेअर दुरूस्ती. मोफत पिक आणि ड्रॉप सुविधा देत एस एस ने मोबाईल दुरूस्तीची नवीन व्याख्या तयार केली आहे. ग्राहक एस एस च्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधून मोबाईल दुरूस्तीसाठी देऊ शकतात.
फायनान्स : फक्त दहा मिनिटांत सर्व प्रमुख फायनान्स कंपनीकडून आपल्या फोऩ टी.व्ही. किंवा इतर महाग वस्तूंसाठी फायनान्स उपलब्ध आहेत.
सिग्नेचर स्टोअर : संस्थापक आणि चेअरमन सिध्दार्थ शाह यांच्या मते : बदलत्या गोष्टींसोबत राहणं सोपं नाही. तुम्हाला स्वतःला बदलत राहावं लागतं बदलत्या ट्रेंड्स, बदलता उद्योग, बदलता रिटेल बिझनेस, ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी सोबत आणि या सगळया बदलासोबत स्वतःला पुढे ठेवणं आनंददायक ठरू शकतं. गेल्या दशकभरात ग्राहकांच्या बदलत्या खरेदीच्या सवयी आणि त्यांच्या खरेदी अनुभवाच्या बदलत्या अपेक्षांमुळे पुर्ण खरेदी पॅटर्नवर खुप प्रभाव पडला आहे. रिटेल वस्तुंच्या वाढत्या पर्यायांमुळे आणि सोईस्कर उपलब्धतेमुळे ग्राहकवर्ग नव्या खरेदी अनुभवांसाठी रिटेल स्टोअरपासून दुरावत चालला आहे. आणि याच सर्व बाबींचा विचार करून आम्ही सिग्नेचर स्टोअरची सुरूवात केली आहे. लोकांना, ग्राहकांना खरेदीचा असाधारण अनुभव देण्यासाठी एस एस ने आपल्या पहिल्या सिग्नेचर स्टोअरची सुरूवात कोल्हापूर मध्ये केली आहे. आता ग्राहकांना खरेदीसाठी विस्तृत पर्याय उपलब्ध असणार आहेत, जे याच्या आधी कधीच नव्हते. जवळपास 2500 चौ. फुटाच्या स्टोअरमध्ये 100 रूपयांपासून ते 30,000 रूपयांपर्यंतचे जेबीएल, बोस, सारेगामा, कारवान, कुलकँडी आणि इतर सर्व ब्रॅन्ड्सच्या सर्व प्रकारच्या ऍक्सेसरीज उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या सर्व मोबाईल आणि ईलेक्ट्रॉनिक्स गरजांसाठी एस एस मोबाईल आणि ईलेक्ट्रॉनिक्स एक वन स्टॉप सोल्युशन आहे. या व्यतिरिक्त सिग्नेचर स्टोअरमध्ये ग्लोबल स्टँडर्ड स्पेसिफिकेशन सर्व्हीस ग्राहकांना मिळणार आहे, ज्यामध्ये ग्राहकांना खरेदीसाठी विस्तृत पर्याय आणि असामान्य ऑफर्स आणि योजनांचा फायदा मिळणार आहे. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वस्तू निवड करण्यासाठी मदत करायला तज्ञ लोकांची टीम सिग्नेचर स्टोअरमध्ये उपस्थित असणार आहे.
एस एस मोबाईल आणि ईलेक्ट्रॉनिक्सचे सी.ई.ओ. कमल गोधवानी म्हणतात, एस एस सिग्नेचर स्टोअरची स्थापना ही आमच्या 60 स्टोअर्स नेटवर्कच्या यशावर बांधलेली आहे. उत्कृष्ट वस्तू निवडण्यासाठी अधिकधिक पर्याय देण्यात येणार आहेत आणि यावर्षी अजून 5 स्टोअर सुरू करण्यासाठी तयार आहेत. एस एस सिग्नेचर स्टोअर ग्राहकांना आनंददायक खरेदी अनुभव देऊन आपले श्रेष्ठता आणि उच्च कायक्षमतेचे वचन जिवंत ठेवत आहे. एस एस सिग्नेचर स्टोअर हे अव्दितीयरीत्या आधुनिक़ नाविन्यपूर्ण स्टोअर आहे आणि तुम्हाला पूर्ण व्यस्त करणार्या वस्तूंचे एक परिपूर्ण मिश्रण आहे.
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |