05:03pm | Aug 08, 2020 |
नवी दिल्ली: भारतासाठी आश्वासक कामगिरी बजावणार्या गोलंदाज जसप्रीत बुमराह विषयी शोएब अख्तरने एक भविष्यवानी केली आहे. शोएब अख्तरच्या म्हणण्यानुसार भन्नाट शैली आणि यॉर्कर चेंडू टाकण्याची कला यामुळे बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहे. मात्र बुमराहची पाठदुखीची समस्या त्याला फारकाळ तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळू देणार नाही. बुमराहला भविष्यात कोणत्या सामन्यांमध्ये खेळायचं आणि कुठे विश्रांती घ्यायची याचा विचार करावा लागणार असल्याचं अख्तरने सांगितलं. तो आकाश चोप्राच्या यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.
बुमराहची शैली वेगळी आहे, तो तिन्ही प्रकारचं क्रिकेट खेळू शकणार नाही. कसोटी क्रिकेटमध्येही त्याने गेल्या काही सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे. तो खूप मेहनती आहे, आपल्याला कुठे जायचंय हे त्याला माहिती आहे. पण त्याची पाठदुखी त्याला साथ देईल का हा मोठा प्रश्न आहे. बुमराहची गोलंदाजीची शैली ही वेगळी असल्यामुळे गोलंदाजीदरम्यान त्याच्या पाठीवर ताण येतो. त्याची पाठ हा ताण कितीकाळ सहन करु शकेल हा महत्वाचा प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी तो दुखापतग्रस्त झाला होता. मी त्याचे सामने पाहत असताना माझ्या मित्रांना नेहमी सांगतो की हा फारकाळ टिकणार नाही. अख्तरने आपलं मत मांडलं.
दुखापतीनंतर जसप्रीत बुमराहने भारतीय संघात पुनरागमन केलं. 2020 वर्षात बुमराह न्यूझीलंडविरुद्ध दौर्यात खेळला, मात्र त्या मालिकेत बुमराहला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. यानंतर करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सर्व सामने बंद होते. या काळात सर्व भारतीय खेळाडू घरी बसून होते. यानंतर आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सर्व खेळाडू सज्ज झाले आहेत. बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो.
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |
जनता बँकेच्यावतीने सत्कार हा माझा घरचा सत्कार : शहाजी क्षीरसगार |
मोबाईल आहे, नेट नाही; त्यामुळे वर्क होईना |
फलटण ग्रामीण पोलिसांनी केली दरोडा टाकणारी टोळी जेरबंद |
जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 56 हजार पार |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |
157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |
157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
माराच्या भितीपोटी अल्पवयीन मुलाने केला चोरीचा बनाव |
ग्रेड सेपरेटरमध्ये केलेले स्टंट युवकास भोवले; गुन्हा दाखल |
अतीमद्य प्राशनाने एकाचा मृत्यू |
विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |