नवी दिल्ली: आयपीएल २०२१च्या दुसऱ्या सत्राला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. आयपीएलच्या या सत्रात कर्णधार विराट कोहलीला एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे. टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहलीला १० हजार धावा पूर्ण करण्यास फक्त ७१ धावांची गरज आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला १० हजार धावांचा टप्पा पार करता आलेला नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार असलेल्या विराटने आतापर्यंत ३११ टी-२० सामन्यात ९ हजार ९२९ धावा केल्या आहेत. यात पाच शतक आणि ७२ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटची सरासरी ४१.७१ तर स्ट्राइक रेट १३३.९५ इतका आहे. विराटनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टी-२० मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. रोहितच्या नावावर ३५० टी-२० सामन्यात ३२.१२च्या सरासरीने ९ हजार ३१५ धावा आहेत. या काळात त्याने ६ शतक आणि ६५ अर्धशतक केली आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने १९९ सामन्यात ६ हजार ०७६ धावा केल्या आहेत. यात ५ शतक आणि ४० अर्धशतक आहेत. शिखर धवन ५ हजार ५७७ धावांसह दुसऱ्या, तर चेन्नई सुपर किंग्जचा सुरेश रैना ५ हजार ४९१ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |