02:29pm | Sep 11, 2020 |
कॅलिफोर्निया: कॅलिफोर्निया जंगलात लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले आहे. या आगीत जवळपास 2 दशलक्ष एकरवरील वनसंपदा भस्म झाली असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. आग अत्यंत वेगाने पसरत असून आत्ता पर्यंत जवळपास 5 लाख लोक बेघर झाले आहेत.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचा सर्वाधिक फटका हा ओरेगनला बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हवेमुळे ही आग वेगाने पसरत असून ओरेगनमध्ये हजारो लोकांची घरं जळाली आहेत.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास पाच लाखांहून अधिक लोक आगीमुळे बेघर झाले आहेत. या आगीमुळे आतापर्यंत सर्वाधिक नुकसान झालं आहे. जनजीवन विस्कळीत झालं लाखो लोकांनी आपलं घर सोडून स्थलांतर केलं आहे. सॅन फ्रान्सिस्कोच्या ईशान्य पूर्वेतील प्लुमास नॅशनल फॉरेस्टमध्ये बुधवारी लागलेली ही आग एका दिवसात 40 किलोमीटरपर्यंत पसरली. काही तासांत 1,036 चौरस किलोमीटर क्षेत्राची राख झाली.
वेगाने पसरलेल्या आगीमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. या आगीतून लोकांना बाहेर काढणंही कठीण होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कॅलिफोर्नियातील जंगलात भडकलेल्या आगीत 2 दशलक्ष हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक झाली आहे. आणखी विध्वंसाची भीती लक्षात घेऊन अमेरिकी वन सेवा विभागाने दक्षिण कॅलिफोर्नियातील सर्व आठ राष्ट्रीय वने बंद केली आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |