11:33pm | Aug 06, 2020 |
सातारा : 27 जुलै रोजी सातारा जिल्हा रुग्णालयात स्त्री जातीचे एक मृत अर्भक स्वच्छतागृहात मिळून आले होते. यासंदर्भात सातारा टुडे ने बुधवार दि. 5 ऑगस्ट रोजी वृत्त सातारा टुडेने प्रसिद्ध केले होते. हे अर्भक स्वच्छतागृहाच्या पाईपमधून काढणार्या सफाई कर्मचार्याने आज रात्री उशिरा विषारी द्रव पिवून आत्महत्त्येचा प्रयत्न केला आहे. सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जिल्हा रुग्णालयातील नकुसा च्या दृश्यम ने उडवली खळबळ असे वृत्त सातारा टुडे ने 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्तामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याप्रकरणाची दाहकता ओळखून यावर चौकशी समिती नेमली होती. असे असताना दोनच दिवसांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी स्वच्छतागृहातून ते स्त्री जातीचे भ्रुण काढणार्या ‘मकवाना’ नामक कर्मचार्यास त्यांचा दालनात बोलावून दम भरला होता. तसेच मी जोपर्यंत याठिकाणी आहे, तोपर्यंत तुला काम करुन देणार नाही, असे म्हणत त्याला कामावरुन काढले होते. तशी प्रतिक्रिया त्या कर्मचार्याने प्रसारमाध्यमांनाही दिलेली होती. संबंधित कर्मचारी हा परप्रांतीय असून काही वर्षांपासून तो सातार्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होता. सिव्हिल हॉस्पिटलमधील ड्रेनेजमध्ये स्त्री जातीचे मृत भ्रुण सापडल्यानंतर तो सिव्हिल सर्जनच्या रडारावर आला होता. एक भानगड समोर आलेली आहे, दुसर्या भानगडी समोर येवू नयेत यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी त्या कंत्राटी कामगारास कामावरुन काढले होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशासह जिल्ह्यातही लॉकडाऊन आहे. प्रत्येकजण रोजीरोटीसाठी धडपडत आहे. असे असताना प्रामाणिक व अती अवघड काम करुनही जिल्हा शल्य चिकित्सकांनी पाठ थोपटण्यापेक्षा निलंबनाची कारवाई केल्याने मकवाना नामक सफाई कर्मचारी कामावरुन काढल्याने मानसिक धक्क्याखाली होता. या नैराश्यातून सफाई कर्मचारी मकवानाने विषारी द्रव्य पिले असावे, असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलेला आहे. दरम्यान आत्महत्त्येस प्रवृत्त करणार्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मकवाना यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |