12:41pm | Nov 21, 2022 |
जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे समजून घेतले पाहिजे की सत्ता कायमस्वरूपी नसते आणि ती येत-जात असते, असे मेघालयाचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना सत्यपाल मलिक म्हणाले की, "मोदीजींनी हे समजून घेतले पाहिजे की सत्तेची पॉवर येते आणि जाते. इंदिरा गांधी यांचीही सत्ता गेली. तेव्हा लोक म्हणायचे की त्यांना कोणीही हटवू शकत नाही. एक दिवस तुम्हीही निघून जाल, त्यामुळे परिस्थिती इतकी बिघडवू नका की, ती सुधारता येणार नाही."
सत्यपाल मलिक रविवारी जयपूरमध्ये राजस्थान युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी, "देशात अनेक प्रकारच्या लढाया सुरू होणार आहेत. शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन केल्यास केंद्र सरकारच्या विरोधात युवकही मोर्चा काढतील." यासोबतच, सत्यपाल मलिक यांनी सैनिक भरतीसाठी राबविल्या जाणाऱ्या 'अग्निपथ' योजनेवरूनही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. या योजनेमुळे सैन्य कमकुवत होऊ शकते आणि केवळ तीन वर्षे सेवा बजावताना सैनिकांमध्ये त्यागाची भावना राहणार नाही, असे ते म्हणाले.
सत्यपाल मलिक पुढे म्हणाले की, जितके आपल्या माहिती आहे. त्यानुसार अग्निवीर सैनिकांना ब्रह्मोससह इतर क्षेपणास्त्रांना आणि शस्त्रांना स्पर्श करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे 'अग्निपथ' योजनेमुळे लष्कराचीही नासधूस होत आहे, असे त्यांनी मत व्यक्त केले आहे. दरम्यान, सत्यपाल मलिक ज्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्या कार्यक्रमात निर्मल चौधरी यांनी राजस्थान विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्षपद स्वीकारले. ऑगस्टमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांची अध्यक्षपदी निवड झाली.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |