11:08am | Jan 06, 2023 |
सातारा : दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून जबरी चोरी करून त्या महिलेच्या डोक्यात दगड घालून तिच्या खून प्रकरणातील संशयितास जेरबंद करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि तळबीड पोलिसांना यश आले आहे. हा गुन्हा पोलिसांनी केवळ चार तासात उघड केला आहे.
सुरज शरद मोहिते रा. मानकर वस्ती, तळबीड, तालुका कराड असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी दहा ते पावणे अकराच्या दरम्यान मानकर वस्ती, तळबीड, तालुका कराड येथे अज्ञाताने एका महिलेच्या घरात घुसून तिचा खून करून तिच्या गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची बोरमाळ आणि एका कानातील कर्णफुल चोरून नेले असल्याची फिर्याद तळबीड पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. सूचनांप्रमाणे तात्काळ पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेतील तपास पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळावर आल्यानंतर देवकर यांनी तळबीड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी पाटील यांनी त्यांना एका इसमाबाबत माहिती मिळाली असून त्याच्यावर संशय असल्याचे सांगितले.
यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने संबंधित महिलेच्या आजूबाजूचे साक्षीदार लोकांकडे विचारपूस केली. त्यावेळी त्यांना अशी माहिती प्राप्त झाली की, संबंधित महिलेच्या घराजवळ राहणाऱ्या एकाने घटनेच्या आदल्या दिवशी संबंधित महिलेस दारू पिण्याकरता पैसे मागितले होते. परंतु त्या महिलेने त्यास पैसे दिले नव्हते. त्याबाबत त्या महिलेने तिचा मुलगा यास घरी आल्यानंतर तसे सांगितले होते. दारू पिण्याकरता पैसे पाहिजे असल्याने त्या इसमाने दुसऱ्या दिवशी सदर महिलेचा खून करून तिच्या गळ्यातील सोन्याची बोरमळ व कानातील कर्णफुल चोरी केले असल्याचा संशय मयत महिलेचा मुलगा व आजूबाजूचे साक्षीदार यांनी व्यक्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील यांना प्राप्त झालेल्या माहिती मधील इसम हा एक असल्याने स्थानिक गुन्हे शाखेतील तपास पथकाने त्या इसमाकडे लक्ष केंद्रित करून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. संबंधित इसम हा उसाच्या रानात लपून बसला असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा त्या ठिकाणी रानात जाऊन शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे तपास पथकाने कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता त्याने दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी संबंधित महिला घरात एकटी असताना तिच्या डोक्यात दगड घालून तिच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ व कानातील कर्णफुल चोरी केली असल्याचे सांगितले. याप्रमाणे जबरी चोरी करण्यासाठी खून केल्याचा गंभीर गुन्हा चार तासाच्या आत उघडकीस आणण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, स्वप्नील धोंड, धीरज महाडिक, विशाल पवार, मोहसीन मोमीन, पंकज बेसके व तळबीड पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील, पोलीस अंमलदार वाकले ,पिसाळ, ओंबासे, दीक्षित, विभुते यांनी केली.
कारवाईत सहभागी झालेल्या अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |