01:08pm | Jun 24, 2020 |
मुंबई: कोरोना संकटकाळात अनेकांना आपल्या नोकर्या गमवाव्या लागल्या. अचानक उद्भलेल्या या संकट काळात मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. गेल्या तीन महिन्यांचा किंबहुन त्यानंतरचा अनुभव पाहता अनेकांनी हा स्वत:चा छोटामोठा बिझनेस सुरू करण्यावर भर दिल्याचे समोर येत आहे. गेल्या आठवडाभरात बिझनेस कसा सुरू करावा याबाबत गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
येणारा काळ हा पूर्वीपेक्षा वेगळा निश्चित असणार आहे. परिस्थिती कधीपर्यंत पूर्वपदावर येईल याबाबत कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. अशात आता नोकरीपेक्षा बिजनेसकडे बहुतांश लोकांचा कल असल्याचं दिसून येत आहे. कारण, गुगलवर गेल्या आठवड्यात लोकांनी बिजनेस कसा सुरू करावा याबाबतच सर्वाधिक सर्च केल्याचं समोर येतंय.
गेल्या आठवड्यात गुगलवर how to start a business बाबत लोकांनी विक्रमी संख्येने सर्च केलं. गुगलने जारी केलेल्या गेल्या आठवड्यातील ट्रेंड्सवरुन ही बाब समोर आलीये. सर्वाधिच सर्च कपड्यांचा व्यापार, ट्रकिंग, ड्रॉपशीपिंग, क्लिनिंग, टी-शर्ट आणि फोटोग्राफी बिजनेस कसा सुरू करायचा याबाबत होत आहे. याशिवाय छोट्या व्यवसायांबाबतही मोठ्या प्रमाणात सर्चिंग झालं. तसंच, कृष्णवर्णीय, महिला आणि अल्पसंख्यांकांच्या बिजनेसला कशाप्रकारे मदत करता येईल याबाबतही अनेक जणांनी सर्च केलं. जगभरातून गेल्या 90 दिवसांमध्ये स्थानिकांना पाठिंबा म्हणजे ‘सपोर्ट लोकल’ या की-वर्डबाबतही मोठ्या प्रमाणात सर्चिंग झालं.
गुगलवर लोकं लहान-मोठ्या बिजनेसबाबत सर्च करत आहेत. कपड्यांच्या व्यवसायाबाबत भारताव्यतिरिक्त जगभरातील अनेक ठिकाणांहून सर्च होत आहे. याशिवाय दागिन्यांच्या बिजनेसबाबतही युजर्स सर्च करतायेत. तर, अमेरिकेत जॉर्ज फ्लोयड मृत्यूप्रकरणानंतर गुगलवर Black owned businesses near me की-वर्डच्या सर्चमध्ये 3,750 टक्के वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय. याशिवाय, minority owned businesses की-वर्ड सर्चमध्ये गेल्या 10 वर्षांचा रेकॉर्ड तुटला. तर, women owned businesses बाबतही अमेरिका आणि अन्य देशांमध्ये सर्चिंगच्या प्रमाणात वाढ झाली. तसेच, गेल्या 90 दिवसांमध्ये support local कीवर्डच्या सर्चमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. support local restaurants बाबत सर्चमध्ये 2020 वर्षात तब्बल 5,000 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. ट्रेंड रिपोर्टनुसार लोकं आपल्या परिसरातील स्थानिक बिजनेसला सपोर्ट करु इच्छितात हे समोर आलंय. एकूणच आता नोकरीपेक्षा बिजनेसकडे नागरिकांचं प्राधान्य असल्याचं अधोरेखीत झालं असून गुगल सर्च ट्रेंडच्या रिपोर्टनुसार करोनाचा फैलाव सुरू झाल्यानंतर बिजनेस सुरू करण्याकडे लोकांचा कल वाढलाय.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |