12:32pm | Jan 24, 2023 |
सातारा : आर्थिक संस्थामध्ये काम करत असताना संस्थेची प्रतिमा जपणाला सर्वोच्च प्राधान्य असते. वैयक्तिक हेवेदावे, संस्थेतील भ्रष्टाचार हा थांबला पाहिजे परंतु ते करताना तो सार्वजनिकरित्या समोर आल्यास संस्थेची प्रतिमा मलीन होऊन संस्थेचे नुकसान होते. हेच गमक लेखक विनोद कुलकर्णी यांना आर्थिक संस्था चालवताना उमगले. त्यांचा वॉचमन ते अध्यक्ष हा प्रवास रोमांचक, स्फूर्तीदायी आहे. पुस्तक लिहिताना ते आकडेवारीत अडकले नाहीत. बँक बुडत असताना त्यांच्याकडे नेतृत्व आले त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचा कस लागला त्याचेही अनुभव या पुस्तकात असून प्रत्येक बँकर्ससाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. विनोद कुलकर्णी सारखे कार्यकर्ते असतील तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही, असा विश्वास मत ज्येष्ठ बँकिंगतज्ञ आणि शिखर बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.
येथील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात संस्कृती प्रकाशन आणि आडकर फौंडेशन आयोजित सातारा जनता सहकारी बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन आणि पॅनेलप्रमुख विनोद कुलकर्णी लिखित 'मोठया बँकेची छोटी गोष्ट' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी अनास्कर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, लेखक विनोद कुलकर्णी, संस्कृती प्रकाशनच्या सुनिताराजे पवार, आडकर फौंडेशनचे ॲड. प्रमोद आडकर, ज्योती कुलकर्णी उपस्थित होते.
अनास्कर पुढे म्हणाले, पुस्तकात लेखक कुलकर्णी यांनी आपल्या चुकांची प्रांजळपणे कबुली दिली आहे. त्यातून त्यांचा प्रामाणिकपणा दिसून येतो. संस्था टिकावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले, त्यासाठी संघर्ष केला. संस्थेची प्रतिमा सुधारली. एखादी संस्था चालवताना किती अडचणी असतात आणि त्यावर मात करताना संस्थेची प्रतिमा न डाळगता कसे प्रयत्न केले पाहिजेत याची उदाहरणे या पुस्तकात आहेत. आर्थिक संस्था म्हटले की आकडेवारीच्या जंजाळात न अडकता त्यांनी अनेक बाबी स्पष्टपणे मांडल्या आहेत त्यामुळे हे पुस्तक बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त असून प्रत्येकाने ते आर्वजून वाचले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांनी लेखक कुलकर्णी यांच्या कार्याचे कौतुक करताना मसापसाठी केलेल्या कामांचा आढावा घेतला. कोणतेही काम करताना त्यासाठी लागणारी धडाडी, कष्ट करण्याची तयारी, ते पूर्ण करण्याची जिद्द त्यांच्याकडे आहे. वेगवेगळया क्षेत्रात ते आघाडीवर कार्यरत असून हे पुस्तक म्हणजे केवळ त्यांचे आत्मचरित्र नाही तर बँकेचे सुध्दा चरित्र आहे. झिरो ते हिरो अशी त्यांची वाटचाल असून त्यातून त्यांचे कर्तृत्व सिध्द झाले. कौटुंबिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय पाशर्वभूमी नसतानाही त्यांनी संघर्ष करुन यश मिळवले. संघर्ष करत असताना कोणाबद्दलही कटुता न ठेवता संस्थाप्रमुखाला सगळे सहन करावे लागते हे पुस्तक वाचल्यानंतर स्पष्ट होते. हे पुस्तक म्हणजे एक प्रकारे बँकेचे महाभारत आहे. सध्याच्या काळात सहकाराकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक झाला असला तरी ग्रामीण भागासाठी सहकार हा कणा असून तो टिकला पाहिजे अन्यथा ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. आर्थिक संस्था चालवताना किती कष्ट करावे लागतात हे कळण्यासाठी सर्वसामान्यांनीही हे पुस्तक वाचले पाहिजे, असे आवाहन केले.
यावेळी संस्कृती प्रकाशनच्या सुनिताराजे पवार, लेखक विनोद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार उध्दव कानडे यांनी मानले. कार्यक्रमास मसापचे पदाधिकारी रवींद्र बेडकिहाळ, दीपक करंदीकर, वि.दा.पिंगळे, राजन लाखे, वजीर नदाफ, संजय माने, ॲड. चंद्रकांत बेले, अजित साळुंखे, गणेश कराड, विक्रम पाटील, माधव दिवाण, अनिल जठार, चंद्रकांत सणस, विजय काटवटे, संध्या पाठक, चिंतामणी विजापूरकर, जनता सहकारी बँकेचे आजी-माजी सेवक वर्ग तसेच आर्थिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व पुणे आणि साताऱ्यातील आर्थिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |