04:20pm | Jun 25, 2020 |
काठमांडू: भारताशी पंगा घेत भारत विरोधी भूमिका घेणार्या नेपाळ पंतप्रधानांना आता पायउतार व्हावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेपाळ पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचा पक्ष आता फुटण्याच्या मार्गावर आहे. सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाच्या नेपाळचे कार्याध्यक्ष पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी पंतप्रधान ओली यांच्यावर टीकेनंतर आता राजीनामा देण्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांनी राजीनामा न दिल्यास ते पक्ष फोडतील असा इशारा प्रचंड यांनी ओली यांना दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. प्रचंड यांना पक्षातही मोठा पाठिंबा मिळत आहे. दोन माजी पंतप्रधान आणि पक्षाच्या अनेक खासदारांनी ओलीविरोधात जाहीर मोर्चा उघडला आहे. त्याचवेळी कोरोना व्हायरस संकाटातही ओली सरकारविरूद्ध नेपाळच्या लोकांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे.
पक्षाच्या स्थायी समितीच्या बैठकीत दहल म्हणाले की, सरकार लोकांच्या अपेक्षांवर काम करण्यास अपयशी ठरले आहे. अध्यक्ष आणि पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अदलाबदल करून सत्ता वाटपाच्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी केला. पक्षाच्या एकीकरणादरम्यान आम्ही अदलाबदल करुन सरकार चालवण्याचे मान्य केले होते, पण मी स्वतः माघार घेतली. सरकारचे काम पाहिल्यानंतर असे वाटते की असे करून मी चूक केली आहे.
केपी शर्मा ओली हे भारतविरोधी भावनांसाठी ओळखले जातात. 2015 मध्ये भारताच्या विरोधानंतरही त्यांनी नेपाळी राज्यघटनेत बदल केला नाही आणि केपी शर्मा भारताच्या विरोधात चीनच्या गोटात गेले. नेपाळ सरकारने चीनशी करार केला. या अंतर्गत चीनने नेपाळला आपला बंदर वापरण्यास परवानगी दिली. पंतप्रधान केपी शर्मा ओली मागील निवडणुकीत भारताविरोधात अनेक विधानं केली होती. त्यांनी भारताची भीती दाखवत दुर्गम भागातील लोक आणि अल्पसंख्यकांना एकत्र आणत सत्ता काबीज केली.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |