01:58pm | May 19, 2022 |
दिल्ली : काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी कोर्टाने दोषी ठरवले आहे. एनआयए कोर्टाने आज निकाल सुनावला. यासिनच्या शिक्षेवर 25 मे रोजी कोर्ट निकाल सुनावणार आहे.
यासिन मलिक याने याआधीच काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली होती. यासिन मलिकवर लावण्यात आलेल्या आरोपांनुसार यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. यासिन मलिकला 25 मे रोजी एनआयए विशेष कोर्ट शिक्षा सुनावणार आहे.
यासिन मलिकविरोधात देशविरोधी कारवायाचा आरोप होता. मलिक विरोधात 'युएपीए' कायद्यातील कलमांसह इतरही अनेक गुन्हे दाखल होते. मागील सुनावणीत यासिन मलिकने दिल्लीतील एनआयए कोर्टात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यानंतर कोर्टाने 19 मे पर्यंत सुनावणी टाळली होती. मलिकने कोर्टाला सांगितले की, त्याच्या विरोधात लावण्यात आलेल्या आरोपांना आव्हान देणार नसल्याचे म्हटले.
यासिन मलिक विरोधात युएपीए कायद्यातील कलम 16 (दहशतवादी कायदा), 17 (दहशतवादी कृत्यासाठी निधी उभारणे), 18 (दहशतवादी कृत्य करण्याचा कट) आणि 20 (दहशतवादी टोळीचा सदस्य) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याशिवाय, भारतीय दंड विधान कायद्यातील 120-ब (गुन्हेगारी कट) आणि 124-अ (देशद्रोह) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यासिन मलिकने जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नावाखाली जगभरातून बेकायदेशीर आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारला असल्याचे कोर्टाने याआधी म्हटले होते.
कोर्टाने काश्मीरमधील फुटीरतावादी नेता फारुख अहमद उर्फ बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसुफ शाह, आफताब अहमद शाह, नयीम खान, मोहम्मद अकबर खंडय, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, झहूर अहमद शाह वातली, शबीर अहमद शाह, नवल किशोर कपूर आदींविरोधात आरोप निश्चित केले आहेत. त्याशिवाय लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन संघटनेचा म्होरक्या सल्लाउद्दीन विरोधातही आरोप निश्चित केले आहेत.
जन्मठेपेची शिक्षा?
यासिन मलिकवर लावण्यात आलेल्या आरोपांनुसार यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. यासिन मलिकला 25 मे रोजी एनआयए विशेष कोर्ट शिक्षा सुनावणार आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |