12:55pm | Oct 12, 2022 |
चंदीगड : तुरुंगामध्ये दीर्घ कालावधीची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांना क्वचितच भेटण्याची संधी मिळत असते. त्यामुळे या कैद्यांच्या जीवनात एकाकीपणा आलेला असतो, तसेच त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असतो. दरम्यान, तुरुंगातील कैद्यांनाही आता त्यांच्या जोडीदारासोबत काही काळ एकांतात घालवण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच या एकांतात शारीरिक संबंध ठेवण्याचीही परवानगी मिळणार आहे. अशी व्यवस्था करणारं पंजाब हे पहिलं राज्य ठरलं आहे. पंजाबमधील तुरुंगात असलेल्या कैद्यांना त्यांच्या जोडीदारासोबत काही काळ एकांतात घालवता येणार आहे.
तुरुंगामध्ये अनेक कैदी हे एकाकी जीवन जगावे लागत असलेल्या तणावाखाली असतात. तसेच त्यांच्या मानसिक स्थितीवरही या नैराश्याचा परिणाम होत असतो. याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, गोईंदवाल कारागृहातील गुरजित या कैद्याला पहिल्यांदा या सुविधेचा लाभ मिळाला आहे. तो हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याने सरकारचे आभार मानले आहेत. माझी पत्नी जेव्हा मला भेटायला आली तेव्हा आम्ही एका खोलीत एकांतामध्ये काही वेळ घालवला, खूप बरं वाटलं, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
मात्र या सुविधेचा लाभ हा गंभीर गुन्ह्यातील आरोपी आणि धोकादायक कैद्यांना मिळणार नाही. सरकारने ही सुविधा देताना नमूद केलेल्या नियमांमध्ये तशी तरतूद करण्यात आली आहे. धोकादायक कैदी, गुंड आणि दहशतवादी यांना ही सुविधा दिली जाणार नाही. तसेच लैंगिक शोषण, बलात्कार आदी गुन्ह्यातील आरोपींनाही ही सवलत मिळणार नाही. त्याशिवाय ज्या कैद्यांना टीबी, एचआयव्हीसारखे गंभीर आजार आहेत, त्यांनाही ही सवलत मिळणार नाही.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |