08:27pm | Apr 17, 2021 |
नवी दिल्ली : चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांना जामीन मिळाला आहे. गेल्या वर्षभरापासून ते तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. जामीन मिळाल्याने आता तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहेत. त्यासोबत त्यांना १० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर काही शर्थी अटी ठेवण्यात आल्या आहेत. मंजुरीविना त्यांना देशबाहेर जाता येणार नाही. तसेच आपल्या घरचा पत्ता आणि मोबाईल नंबर बदलण्यास मनाई करण्यात आली आहे. लालू प्रसाद यादव यांच्यावर सध्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
लालू प्रसाद यादव यांच्या जामीनावर ९ एप्रिलला सुनावणी होणार होती. मात्र सीबीआयने जबाब नोंदवण्यासाठी न्यायालयाकडे अवधी मागितला होता. त्यानंतर झालेल्या सुनावणीत जामीन मंजूर करण्यात आला आहे. दुमका कोषागार गैरव्यवहार प्रकरणात लालू प्रसाद यादव यांनी अर्धी शिक्षा पूर्ण केली आहे. हा दावा जामीन अर्ज दाखल करताना करण्यात आला होता. या प्रकरणी सीबीआय न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना सात-सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. वेगवेगळ्या कलमांतर्गत ही शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांनी शिक्षेचा अर्धा कालावधी पूर्ण केला नसल्याचा दावा सीबीआयने केला होता. तर चाईबासा आणि देवघर प्रकरणात लालू यादव यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे.
जामीन मिळाल्यानंतर आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांनी आनंद व्यक्त करत न्यायालयाचे आभार मानले आहेत. लालू प्रसाद यादव यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी दोन दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |