11:12pm | Sep 25, 2020 |
सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी 32 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 922 बाधितांची नोंद झाली आहे. तसेच 831 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 831 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील बाधितांची वाढती संख्या व वाढता मृत्यूदर हा सातारकर व प्रशासनासाठी रोज प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. शुक्रवारी 32 बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 1032 झाली आहे. तसेच 922 जण बाधित निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या 34 हजाराचा आकडा पार करीत 34 हजार 609 वर पोहोचली आहे. शुक्रवारी विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 831 नागरिकांना कोरोनातून बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या 24 हजारांचा आकडा पार करीत 24 हजार 46 वर पोहोचली आहे. याचबरोबर 831 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
32 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असललेल्या अंबवडे ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय महिला, आणे ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, जांब बुद्रुक ता. कोरेगाव येथील 59 वर्षीय पुरुष, कुडाळ ता. जावळी येथील 70 वर्षीय पुरुष, सायगाव ता. जावळी येथील 66 वर्षीय महिला, व्यंकटपुरा पेठ सातारा येथील 72 वर्षीय महिला, सासपडे ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, भक्तवडी ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय महिला, खेड ता. सातारा येथील 89 वर्षीय पुरुष, धोंडेवाडी ता. खटाव येथील 51 वर्षीय पुरुष, मोरे कॉलनी ता. सातारा येथील 80 वर्षीय महिला, साईगडे ता. पाटण येथील 55 वर्षीय पुरुष, निनाम पाडळी ता. सातारा येथील 51 वर्षीय पुरुष, तारणे ता. सातारा येथील 90 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध् हॉस्पिटलमध्ये बुधवार पेठ फलटण येथील 78 वर्षीय पुरुष, धुळदेव ता. फलटण येथील 83 वर्षीय पुरुष, तडवळे ता. कोरेगाव येथील 72 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, जाधवाडी नुने ता. पाटण येथील 75 वर्षीय महिला, तसेच रात्री उशिरा कळविलेले आनंदनगर ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, सदरबझार सातारा येथील 83 वर्षीय महिला, अतित ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, विद्यानगर ता. कराड येथील 72 वर्षीय पुरुष, मुंडे ता. कराड येथील 64 वर्षीय पुरुष, राजमाची ता. कराड येथील 76 वर्षीय पुरुष, नादोली ता. पाटण येथील 57 वर्षीय पुरुष, कराड येथील 78 वर्षीय पुरुष, पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ ता. कराड येथील 84 वर्षीय महिला, लोणंद ता. खंडाळा येथील 65 वर्षीय पुरुष, दुशेरे ता. कराड येथील 60 वर्षीय पुरुष, पार्ले ता. कराड येथील 67 वर्षीय पुरुष अशा एकूण 32 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
831 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 16, उपजिल्हा रुग्णालय कराड 24, उपजिल्हा रुग्णालय फलटण 48, कोरेगाव 75, वाई 71, खंडाळा 44, रायगांव 116, पानमळेवाडी 132, मायणी 43, महाबळेश्वर 60, दहिवडी 43, खावली 19, तळमावले 27 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 113 असे एकूण 831 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |