11:21pm | Sep 29, 2020 |
सातारा : सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या माध्यमातून संयोजकांनी जगातील खेळाडूंच्या चेतना जागविण्याबरोबरच त्यांना पळण्याचे मुक्त विद्यापीठ उपलब्ध करून देण्याचा सामाजिक वसा जोपासला असतानाच, सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना कोरोना बाधितांना नवसंजीवनी मिळावी, यासाठी सातारा रनर्स फाउंडेशनच्यावतीने सातारा जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या नवीन 'आय.सी.यु'करिता साडेसात लाख रुपये किमतीचे १४ मल्टीपॅरा मॉनिटर देऊन आपण केवळ खेळाडूंसाठीच नव्हे तर सर्वसामान्य जनतेसाठीही काम करत असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा येथे साडेसहा लाख रुपये खर्च करून साताऱ्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी खुल्या व्यायाम शाळेची निर्मिती करण्यात आली असून लवकरच त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. सातारा हाफ हिल मॅरेथॉनच्या संयोजकांनी जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर 'सातारा टुडे' च्या प्रतिनिधींनी संयोजकांची भेट घेऊन त्यांच्याशी वार्तालाप केला. मार्च २०२० मध्ये सातारा जिल्ह्यात कोरोना दाखल झाला. बघता बघता त्याने सर्वत्र हाहाकार उडवून दिला. कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूमुळे मोठ्या प्रमाणावर कुटुंबाची पडझड होऊ लागली. कोरोनाबाधित व्यक्तीनी हॉस्पिटल गच्च भरू लागली. बेड, पीपीई किट, व्हेंटिलेटर, ऑक्सीजन मशीन, रेमडीसिवर इंजेक्शन याचा फार मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला. रुग्णांची संख्या अधिक आणि वैद्यकीय पथक, नर्सेस यांची संख्या नगण्य अशी विदारक स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली. विविध संस्था, सामाजिक काम करणारे कार्यकर्ते शक्य तेवढी मदत करण्यासाठी पुढे आले. अशा भिषण परिस्थितीत सातारा हिल मॅरेथॉनच्या संयोजकांनी सातारा रनर्स फाउंडेशनच्यावतीने कोणतीही बातमी न करता मदतीचा हात पुढे केला. सातारा हिल मॅरेथॉन यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय क्षेत्रातील अनेक व्यक्ती कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक सेवेतूनच नव्हे तर शासनाला सहकार्य करीत सिविल हॉस्पिटलमध्येही वेळोवेळी रुग्णांची सेवा केलेली आहे. लॉकडाउनच्या काळात साताऱ्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. परगांवाहून आलेले आणि शहरात अडकलेल्या प्रवासी व गरजू नागरिकांसाठी धान्यवाटप करून भुकेलेल्या पोटाला आधार देण्याचा प्रयत्न केला होता. सातारा जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या नवीन आयसीयुकरिता लागणारी संपूर्ण सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टिम म्हणजेच जवळपास साडेसात लाख रुपयांचे (१४ मल्टीपॅरा मॉनिटर) देऊन त्याचे लोकार्पण जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. हे काम करताना आयोजकांनी कधीही कॅमेराच्या पुढे येऊन बडेजावपणा केला नाही, हे विशेष. सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या माध्यमातून 'धावणाऱ्याचे' शहर असे साताऱ्याचे नाव जगभर झाले ते याच संयोजकांमुळे. हे काम करताना संयोजकांनी स्वतःच्या नावाचे फ्लेक्स कधीही ठेवले नाहीत. कोणते पद किंवा पुरस्कार मिळावा अशी अपेक्षाही ठेवली नाही. मॅरेथॉन हा काही संयोजकांचा धंदा नाही. दि. १० एप्रिल २०२० रोजी जगातील पहिली 'स्टे होम मॅरेथॉन' आयोजित केली. कोरोनाच्या काळात भीतीने घरात बसून राहिलेल्या सातारातील व जगभरातील हजारो लोकांनी यात सहभाग घेतला. त्यामुळे त्यांची मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती चांगली राहण्यासाठी काही प्रमाणात का होईना हातभार लागला. राज्यात नव्हे, देशात नव्हे तर जगात पहिल्यांदाच असा प्रयोग झाला. भारताव्यतिरिक्त यामध्ये अमेरिका, सिंगापूर, पेरू, बांगलादेश अशा अनेक देशातील धावपटूंनी सहभाग घेतला. या सर्व गोष्टीवर जवळपास ३ लाख रुपये खर्च आला. गेल्या तीन महिन्यांच्या काळात श्री. छ. शाहू मंडळ सातारा, माचीपेठ येथे आबालवृद्धांसाठी पूर्णपणे मोफत अशा खुल्या व्यायामशाळेची उभारणी केली. याच धर्तीवर सातारा येथील पोलीस परेड ग्राउंड येथे व्यायाम शाळेची उभारणी नुकतीच पूर्ण झाली आहे. या दोन्ही खुल्या व्यायाम शाळेच्या लोकार्पण लवकरच होणार आहे. या दोन्ही खुल्या व्यायाम शाळांना साडेसहा लाख रुपये एवढा खर्च आला आहे.
असाही एक वाईट अनुभव
दोन वर्षांपूर्वी सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने साताऱ्यातील भूविकास बँकेजवळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातील वाहतूक बेटाचे बांधकाम आणि सुशोभीकरण हातात घेतले होते. त्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने या वर्दळीच्या ठिकाणी एक अत्यंत सुंदर असे ट्रॅफिक आयलँड विकसित केले. या आयलँडच्या मध्यभागी, गोल आकारात उंच टेकडीवजा रचना करून त्यावर हिरवेगार लॉन आणि रंगीत पानाफुलांची शोभेची झाडे लावली. त्या झाडांना ठिबक सिंचनाद्वारे कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था केली. धावत्या पळत्या मॅरेथॉनप्रेमी साताऱ्याचे प्रतीक म्हणून - आई, बाबा आणि मुला-मुलीची एक जोडी अशा एका 'धावणाऱ्या कुटुंबा'च्या धातूच्या प्रतिकृती खास बनवून घेतल्या. तीन मुख्य रस्ते त्या चौकात येऊन मिळतात, मग या प्रत्येक रस्त्याच्या तोंडावजवळच्या कोपऱ्यावर या प्रतिकृती बसविल्या. चौकाच्या मध्यभागी उंचवटा करून त्याच्या केंद्रस्थानी उंचावर नेताजी 'सुभाषचंद्र बोस चौक' असे नाव, त्याखाली सातारा हिल हाफ मॅरेथॉनचा लोगो आणि त्याच्या खाली 'माझा सातारा माझी मॅरेथॉन', असं घोषवाक्य असलेल्या अक्षरांची सजावट केली होती. हे सर्व एल.ई.डी लाईट्स लावून रात्रीच्या वेळेस अतिशय आकर्षक दिसेल अशी प्रकाशयोजना केली होती. मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी एक्स्पोच्या वेळेस देश विदेशातून आलेल्या हजारो धावपटूंच्या उपस्थितीत याचे उद्धाटन होणार होते. सातारच्या वैभवात भर घालणारा हा अतिशय देखणा प्रकल्प संयोजकांनी खूप कष्टाने उभारला होता. पण ऐन वेळी यात काही लोकांनी त्यांच्या वैयक्तिक हेव्या-दाव्यापोटी विघ्न आणले. या चौकाचं नाव बदलण्याचा घाट घातलाय अशी अफवा पद्धतशीरपणे पसरवण्यात आली. वास्तविक असे काही करण्याचा प्रश्नंच नव्हता आणि तसे काही करण्याचा आम्हाला नैतिक व कायदेशीर अधिकारही नव्हता. संयोजकांनी खूप समजावून सांगितले, की चौकाचे नाव 'नेताजी सुभाषचंद्र बोस चौक' असेच आहे, आम्ही किंवा कुणीही अशा पद्धतीने चौकाचं नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्याबाबत रीतसर निवेदन देऊन तत्कालीन जिल्हाधिकारी सौ. श्वेता सिंघल यांच्याकडे संयोजकांनी बाजू मांडली. त्यांनी 'काळजी करू नका, मी यात लक्ष घालते' असे आश्वासन दिले. सातारा रनर्स फौंडेशनची भूमिका आणि याबाबतची सत्य परिस्थिती स्पष्टपणे मांडणारी सविस्तर पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकली, त्यालाही नागरिकांचा भरघोस पाठिंबा मिळाला. एवढे सगळे करूनही जे व्हायला नको होते ते झालेच. एक्स्पोच्या दिवशी संयोजक तयारीत मग्न असताना, पद्धतशीरपणे ठरवून एका टोळक्याने नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात गर्दी करून घोषणाबाजी सुरू केली. संयोजकांनी तिथे पोहचून त्यांना पुन्हा समजविण्याच्या प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. तुम्ही चौकाचं नाव बदलण्याचा घाट घातलाय, तुम्हाला पुतळे बसवायची परवानगी नाहीये, असा वाद घालायला सुरुवात केली. संयोजक त्यांच्याशी बोलत असतानाच गर्दीतल्या एका व्यक्तीने वर चढून सजावटीची तोडफोड सुरु केली. संयोजकांना या सर्व किळसवाण्या प्रकाराचा इतका मनस्ताप झाला की उद्विग्न होऊन शेवटी आम्ही त्याच ठिकाणी घोषणा केली की आम्ही आता स्वतःहून सगळी सजावट आणि धावपटूंच्या प्रतिकृती वगैरे काढून घेतो, पण तोडफोड करू नका. वास्तविक संयोजकांच्या चांगल्या हेतूला उलट 'हे मनमानी करतात, कायदा मोडतात' असे चुकीचे आणि धादांत खोटे आरोप करून वेळोवेळी 'आडवं' लावण्याचा प्रयत्न काही लोकं करत असतात.
संयोजकांचे नवीन धोरण निश्चित
वारंवार होणाऱ्या या सर्व प्रकाराला कंटाळून आता सातारा शहरात आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी खुल्या व्यायामशाळा निर्माण करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला आहे. मोक्याच्या ठिकाणी उभारलेल्या आणि पूर्णपणे मोफत अशा या खुल्या व्यायामशाळांमुळे रस्त्यांवरून धावणाऱ्या, चालणाऱ्या लोकांसाठी महत्वाचे असलेले 'क्रॉस ट्रेनिंग' येता जाता करण्याची सोय यामुळे उपलब्ध होत आहे. जिथं कुठे परवानगी मिळेल तिथे सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी आणि खात्री करून हे काम करत राहणार आहोत. आजवर अशा चार खुल्या व्यायामशाळा उभारल्या आहेत. या विधायक कामासाठी मॅरेथॉनच्या माध्यमातून निधी उभारायचा आणि जास्तीत जास्त ठिकाणी असे उपक्रम उभारण्याचा संयोजकांचा प्रयत्न इथून पुढेही अव्याहतपणे सुरूच राहणार आहे. सुमारे चाळीस मिनिटे सातारा हिल मॅरेथॉनच्या संयोजकांशी वार्तालाप करताना असे लक्षात आले की समाजात विधायक कामे करताना अनेक अडचणी येतात. मात्र या अडचणींवर मात करूनही काहीजण समाजसेवेचा वसा घेऊन, त्याचा गवगवा न करता अहोरात्र काम करत असतात. हेच वास्तव सातारा हाफ हिल मॅरेथॉनच्या कामगिरीवरून दिसून येत आहे.
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |