01:38pm | Jul 04, 2020 |
कोलंबो: कुरोपतखोर चीनने भारताविरोधात कारवाया सुरू केल्यानंतर नेपाळ आणि पाकिस्ताननेही या पंक्तीत बसून स्वत:च्या पायावर धोंडा मारण्याचा इरादा स्पष्ट केला. आता यांच्या पंक्तीत श्रीलंकाही आल्याची चर्चा सुरू आहे. सध्या श्रीलंकेकडूनही भारतविरोधी पावले उचलले जात असल्याची चर्चा सुरू आहे. श्रीलंका सरकारने कोलंबो येथील जया कंटनेर आणि इस्टर्न कंटेनर टर्मिनल प्रकल्पाची (ईसीटी) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. इस्टर्न कंटनेर टर्मिनल प्रकल्प श्रीलंका, भारत आणि जपान संयुक्तपणे राबवणार होते. सिरीसेना यांच्या सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. हा प्रकल्प भारताच्या दबावात राबवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत होता.
जेसीटीच्या विकासाशी संबंधित खरेदी प्रक्रिया आणि त्याच्याशी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. टर्मिनलच्या बांधकामाशी निगडीत सर्व बाबींचीही चौकशी करण्यात येणार आहे. भारताच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. चीनचा श्रीलंकेमध्ये हस्तक्षेप वाढला आहे. श्रीलंकेतील एक बंदर चीनने 99 वर्षांसाठी भाडेतत्वावर घेतला आहे. हे बंदर सामरीकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. चीनला शह देण्यासाठी भारतानेदेखील श्रीलंकेतील बंदराच्या विकासासाठी पुढाकार घेतला असल्याची चर्चा आहे. श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती सिरीसेना यांनी चीनपेक्षा भारताला प्राधान्य दिले होते. त्यांच्याच कार्यकाळात श्रीलंका, भारत आणि जपान यांच्या भागिदारीत इस्टर्न कंटनेर टर्मिनल प्रकल्प सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती.
ईसीटी प्रकल्प हा 50 कोटी अमेरिकन डॉलरचा असून कोलंबो इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनलजवळ आहे. या प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर मागील वर्षीच स्वाक्षर्या करण्यात आल्या होत्या. औपचारीक करारावर स्वाक्षरी होणे अद्याप बाकी आहे. या प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षरी केल्यास बंदरावरील कामगारांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मागील काही दिवसांपासून त्यांनी आंदोलन पुकारले होते. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी कामगार संघटनांशी चर्चा केल्यानंतर या प्रकल्पाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प रखडल्यास भारताला नुकसान होण्याची भीती आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |