03:22pm | Sep 14, 2020 |
नवी दिल्ली: जोफ्रा आर्चरच्या भेदक मार्यापुढे कांगारू बॅकफुटवर गेल्याने इंग्लंडला दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याची संधी मिळाली. पहिला वन-डे सामना जिंकून मालिकेची धडाकेबाज सुरुवात करणार्या ऑस्ट्रेलियाने दुसर्याच सामन्यात निराशा केली आहे. इंग्लंडला 231 धावांवर रोखल्यानंतर चांगली सुरुवात केल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि यजमान इंग्लंडने 24 धावांनी सामना जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. विजयासाठी 232 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्स आणि सॅम करन यांच्या भेदक मार्यासमोर 207 धावांपर्यंतच मजल मारु शकला.
ऑस्ट्रेलियाची सुरुवातही खराब झाली होती. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि तिसर्या क्रमांकावर आलेला स्टॉयनिस झटपट माघारी परतले. यानंतर कर्णधार फिंच आणि लाबुशेन यांनी भागीदारी करुन ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. फिंचने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. लाबुशेनसोबत भागीदारीदरम्यान फिंचने आपलं अर्धशतकही साजरं केलं. 144/2 अशी धावसंख्या असताना ख्रिस वोक्सने लाबुशेनला माघारी धाडलं. अवघ्या 2 धावांनी त्याचं अर्धशतक हुकलं. यानंतर मधल्या फळीत कॅरीचा अपवाद वगळता एकही ऑस्ट्रेलियन फलंदाज तग धरु शकला नाही. फिंचही कालांतराने 73 धावा काढून माघारी परतला. जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्स आणि सॅम करन यांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. 10 षटकांत 2 षटकं निर्धाव टाकून 34 धावा देत 3 बळी घेणार्या आर्चरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
तत्पुर्वी इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो हे स्वस्तात माघारी परतले. जेसन रॉय 21 धावा काढून माघारी परतला तर बेअरस्टोला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर जो रुट आणि कर्णधार मॉर्गन यांनी पुन्हा एकदा छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. परंतू यावेळी रुटने केलेली संथ खेळी इंग्लंडला चांगलीच मारक ठरली. 73 चेंडूत रुटने 4 चौकार आणि एका षटकारासर 39 धावा केल्या. झॅम्पाने रुटला माघारी धाडत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. यानंतर इंग्लंडच्या मधल्या फळीने पुन्हा एकदा निराशा केली. अखेरच्या फळीत टॉम करन आणि आदिल रशिद यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने 231 धावांचा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियाकडून झॅम्पाने 3, मिचेल स्टार्कने 2 तर हेजलवूड-कमिन्स आणि मार्श या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.
आदेशाचे उल्लंघन केल्याने परदेशी नागरिकांवर गुन्हा |
महिलेचा आकस्मिक मृत्यू |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
मर्ढे येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले |
खंडाळा येथून बजाज पल्सर लंपास |
युवतीचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न |
शिवथर येथील दोघांवर साताऱ्यात तलवार हल्ला |
मोफत कोरोना लसीकरणाचा लाभ घेण्याचे खा.श्री.छ.उदयनराजेंनी केले आवाहन |