05:27pm | May 28, 2020 |
नवी दिल्ली : स्थलांतरीत मजुरांची सद्य परिस्थिती पाहून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत. मेधा पाटकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. या याचिकेत त्यांनी स्थलांतरीत मजुरांना घरी सुखरुप आणि सुरक्षित पोहचवण्यासाठी काही मागण्या केल्या आहेत. रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या मंजुरीवर अवलंबून राहू नये, अशीही या याचिकेत मागणी करण्यात आलीय. शिवाय आपल्या घरी शेकडो मैल अंतर कापत निघालेल्या मजुरांसाठी आश्रय गृह आणि जेवणाची सोय उपलब्ध करून देण्याचीही मागणी त्यांनी आपल्या याचिकेतून केलीय.
तिकीट प्रणालीच्या वापरासाठी एक समान मंच बनवला जावा, स्थलांतरीत मजुरांना घरी पोहचवण्यासाठी रेल्वेला राज्यांच्या परवानगीची गरज भासू नये, स्थलांतरीत मजुरांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावं, लॉकडाऊननंतर या मजुरांसाठी रोजगाराची व्यवस्था करावी आदी मागण्या मेधा पाटकर यांनी याचिकेद्वारे केलेल्या आहेत. स्थलांतरीत मजुरांच्या मुद्यावर बुधवारी काँग्रेस पक्षही सर्वोच्च न्यायालयात पोहचलाय. काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज दाखल केलाय. सर्वोच्च न्यायालयात होणार्या सुनावणीत आपल्यालाही पक्षकार बनवण्याची मागणी त्यांनी केलीय. ’देशात वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांच्या समस्येवर उपाय शोधून काढण्यासाठी राजकीय पक्षांसोबत कोणतीही संयुक्त समिती गठीत करण्यात सत्ताधार्यांना अपयश आल्याचं’ही त्यांनी या याचिकेत म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, स्थलांतरीत मजुरांच्या मुद्यावर याआधी सर्वोच्च न्यायालयानं स्वत:हून हस्तक्षेप करत राज्य आणि केंद्र सरकारला जाब विचारला होता.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |