04:29pm | Nov 04, 2022 |
अमृतसर : शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर पंजाबमध्ये भरदिवसा हल्ला करण्यात आला आहे. अमृतसरमध्ये त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गोपाळ मंदिराच्या बाहेर कचऱ्यात देवांच्या मूर्ती आढळल्यानं ते मंदिराबाहेर धरणे आंदोलन करत होते. यावेळी गर्दीतून अज्ञातानं येत गोळीबार केला.
चार वर्षांपूर्वी सुधीर सुरी यांच्यावर हल्ला झाला होता. गेल्या काही दिवसांपासून सुधीर सुरी यांच्यावर हल्ल्याचे प्रयत्न झाले होते. पोलिसांनी गेल्या महिन्यात काही जणांना अटक केली होती त्यात ही बाब स्पष्ट झाली होती. पंजाब एसटीएफ आणि अमृतसर पोलिसांच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये गेल्या महिन्यात ४ जणांना अटक करण्यात आली होती. ते चार जण गँगस्टर रिंदा आणि लिंदा या गँगशी संबंधित होते. त्यांच्या चौकशीतून ही बाब समोर आली आहे.
सुधीर सुरी हे शिवसेना नेते असल्याचं सांगितलं जात असून अमृतसरमधील आंदोलनात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. त्यांना सध्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अमृतसरमधील मजिठा रस्त्यावर ते धरणे आंदोलन करत होते.
अमृतसरमधील मजिठा रस्त्यावरील मंदिराबाहेर सुधीर सुरी आंदोलन करत होते. कचरा हटवला नाही तर मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांविरोधात तक्रार करु, असं ते म्हणाले होते. सुधीर सुरी यांची पोलिसांसोबतआंदोलनासंदर्भात चर्चा सुरु होती. या दरम्यान संदीप नावाच्या एका तरुणानं सुधीर सुरी यांच्यावर हल्ला केला आहे. पोलिसांनी संदीपला ताब्यात घेतलं असून शीख विरोधी वक्तव्य केल्यानं हल्ला केल्याचं संबंधित तरुणानं सांगितलं आहे. संदीप नावाचा हा तरुण अमृतरसरमधील असून नेमक्या कोणत्या गटाशी संबंधित आहे, याबाबतची सविस्तर माहिती समोर आली नाही.
सुधीर सुरी यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आम्ही सर्व गोष्टींची पडताळणी करत असल्याचं पंजाब पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सर्व बाबींची तपासणी झाल्यानंतर सुधीर सुरी यांच्यावरील हल्ल्यासंदर्भातील माहिती देऊ, असं पोलीस म्हणाले. सुधीर सुरी यांना अमृतसरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |