09:31pm | Jun 17, 2021 |
सातारा : अवैध दारूची वाहतूक करताना बोरगाव पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. वर्णे (ता. सातारा) येथे गुरुवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी यावेळी देशी दारूच्या बाटल्यांसह मारुती ओमनी कार असा 1.26 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी ओमप्रकाश हरिदास राठोड (वय.22) व सागर विजय राठोड (वय.21,दोघे रा.अपशिंगे मि., ता.सातारा) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मारुती ओमनी गाडीतून अवैध दारू होणार असल्याची माहिती गुरुवारी सकाळी बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांना मिळाली. माहितीच्या अनुषंगाने सकाळी 9.30 च्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळीम्बकर, हवालदार विशाल जाधव, प्रशांत मोरे, उत्तम गायकवाड, राहुल भोये यांनी अंगापूर- वर्णे जाणार्या रस्त्यावर वर्णे (ता.सातारा) गावच्या हद्दीत कमानीजवळ सापळा रचला.
यावेळी सकाळी 10.30 च्या सुमार संशयित मारुती ओमनी गाडी वर्णे गावच्या दिशेने येताना दिसल्यावर पोलिसांनी ती गाडी अडवली. गाडीची तपासणी केली असता आतमध्ये देशी दारूचे 10 बॉक्स आढळले. या बॉक्समध्ये 90 मिलीच्या 1000 बाटल्या आढळल्या. पोलिसांनी या 10 बॉक्ससह मारुती ओमनी कार असा 1 लाख 26 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून कारमधील ओमप्रकाश हरिदास राठोड व सागर विजय राठोड या दोन युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास हवालदार विजय देसाई करीत आहेत.
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |

जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |