बुध: एकात्मिक बाल विकास सेवा अभियान अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प खटाव यांच्या नियोजनातून राबविण्यात येणारा बीटस्तरीय पोषण पंधरवडा समारंभ मौजे वेटणे येथील (कै.) जगन्नाथ नलवडे स्मृतीभवन येथे नुकताच संपन्न झाला.
बुध बीटातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी या पंधरावडा समारंभात बहुसंख्येने सहभाग घेतला होता. या समारंभात बेटी बचाव बेटी पढाव, अन्नप्राशन दिन, गरोदर माता, स्तनपान, सेल्फी पॉइंट, स्त्रीभ्रूणहत्या विषयक रांगोळी रेखाटन, पोषण आहार नमुने, सुपोषण दिवस, बाळ कोपरा, गरोदर माता नोंदणी अशा विविध महत्त्वपूर्ण विषयावरील अभिनव उपक्रम राबविण्यात आले होते. पर्यवेक्षिका श्रीमती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बुध बीटातील सर्व अंगणवाडी सेविकांनी विविध विषयानुरूप आहार विषयक व स्त्री प्रबोधनपर अनेक साधने तयार करून त्यांची प्रदर्शन रूपात मांडणी केली होती. गावातील व परिसरातील महिलांना यावेळी प्रबोधनपर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा जि.प. सदस्या सुनीताताई कचरे यांनी आपल्या भाषणात लेक वाचवा लेक वाढवा, स्त्री-भ्रूणहत्या, आहाराची काळजी व करोना काळात घ्यावयाची दक्षता यावर सर्वंकष मार्गदर्शन केले. प्रकल्प अधिकारी श्री.उदमले यांनी पोषण आहार अभियान पंधरवडा उपक्रमाच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमासाठी वेटणे येथील अंगणवाडी सेविका उषा नलवडे, सुरेखा इंदलकर, जगुबाई देवकर तसेच मदतनीस दिपाली गुरव व उज्वला इंदलकर यांनी परिश्रम घेतले.
यावेळी वेटणे गावच्या सरपंच सायली कोरडे, सरपंच अभयसिंह राजेघाटगे, उपसरपंच महेश नलवडे, सामाजिक कार्यकर्ते संजय नलवडे, अमृत नलवडे, ताराचंद नलवडे, विविध ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ तसेच महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पर्यवेक्षिका श्रीमती काकडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |