02:18pm | Nov 06, 2022 |
दिल्ली : सागर धनखर हत्या प्रकरणातील आरोपी कुस्तीपटू सुशील कुमार याला जामीन मिळाला असून तिहार तुरुंगामधून त्याची सुटका झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली उच्च न्यायालयाने सुशीलला अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
सुशीलची पत्नी आजारी असून तिच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे, त्यामुळे न्यायालयाने सुशीलला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे 12 नोव्हेंबर पर्यंत सुशीलाला कुटुंबाला वेळ देता येणार आहे. जमीन मिळाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव सुशीलला गेट क्रमांक 4 ऐवजी अन्य गेटमधून तुरुंगाबाहेर सोडण्यात आले. सुशीलच्या सुटकेचे आदेश शनिवारीच तिहार तुरुंगामध्ये आले होते. शुक्रवारी सुशीलला अंतरिम जामीन मंजूर झाला.
सुशीलच्या पत्नीची 7 नोव्हेंबरला शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुशीलच्या सुरक्षेसाठी आणि त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी दोन सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिवाजी आनंद यांनी सुशीलला 12 नोव्हेंबरपर्यंत जामीन मंजूर केला. जामीन मंजूर करताना न्यायालयाने अनेक अटी घातल्या आहेत. सरकारी वकिलांनी सुशीलला जामीन देण्यास विरोध केला असला तरी, कुटुंबाची परिस्थिती पाहता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, आरोपीची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांची स्थिती पाहता जामीन मंजूर करण्यात येत आहे. यासोबतच जामिनाची मुदत संपताच म्हणजेच 13 नोव्हेंबरला सुशीलला कारागृह अधीक्षकांसमोर शरण जाण्याची सूचना दिली आहे. 4 मे 2021 च्या रात्री सागर आणि सोनू यांना छत्रसाल स्टेडियममध्ये बेदम मारहाण करण्यात आली होती. रुग्णालयात उपचारादरम्यान सागरचा मृत्यू झाला तर सोनू महल हा गंभीर जखमी झाला. सुशील हा सागर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |